आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानांमध्ये असतात सिक्रेट बेडरूम्स, बहुतांश प्रवाशांना याबाबत माहित नसते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विमान प्रवास आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आला आहे. पण, विमानाचे असे काही भाग असतात, त्याबाबत आपल्याला माहित नसते. विमानात सिक्रेट बेडरुम्स असतात, याबाबत तर चांगल्या चांगल्या प्रवाशांना कल्पना नसते.

 

विमानात या बेडरुम्समध्ये विश्रांती घेतात एअर होस्टेस

तुम्ही कॉकपिट हे नाव ऐकले असेल. अनेकदा चित्रपटात ते पाहिलेही असेल. पायलट ज्याठिकाणी बसून विमान उडवतात त्याला कॉकपिट म्हणतात. पण एवढ्या लांबच्या प्रवासात एअर होस्टेस विश्रांती कुठे घेतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, विमानात विशिष्ट बेडरुम्स असतात, हे काही मोजक्याच लोकांना माहीत असेल.

 

कॉकपिटजवळच एक सिक्रेट दरवाजा असतो. त्यातून पायऱ्यांवरून विना खिडक्यांच्या बेडरूमपर्यंत जाता येते. याच्या जवळून गेल्यावरही आपल्या लक्षात येणार नाही की याठिकाणी बेडरूम असेल. या रुम्समध्ये सुमारे 6 फुटांचा बेड असतो तसेच बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून जाड पडदेही असतात. मोठ्या विमानांत पायलट्ससाठीही वेगळे बेडरूम असतात.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विमानातील सिक्रेट बेडरुम्सचे PHOTOS..

 

बातम्या आणखी आहेत...