आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची फसवणूक...एक फ्लॅट विकला दोन ते तीन जणांना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची एका बिल्डरने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अ‍नुराधा यांनी विरार (पश्चिम) मधील ग्लोबल सिटी परिसरात दोन फ्लॅट खरेदी केले होते. मात्र, बिल्डरने त्यापैकी एक फ्लॅट अनुराधा पौडवाल यांच्यासह दोन ते तीन जणांना विकून आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी विरारमधील अर्नाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

अविनाश डोले, राजीव सुलेरी अशी आरोपींची नावे आहे. त्यांनी मंदार असोसिएट नावाने कंपनी स्थापन केली होती.  या कंपनीच्या माध्यमातून दोघांनी ग्राहकांना प्लॅट विकले होते. अनुसाधा पौडवाल यांनीही आरोपींकडून दोन फ्लॅट खरेदी केले होते. मात्र, त्यापैकी एक फ्लॅट आरोपींनी दोन ते तीन जणांना विकल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत आरोपींनी नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...