Home | Maharashtra | Mumbai | Sensational disclosure In ATS Charge sheet Claim Accused plot blast in Mumbai and Pune

मुंबईसह पुण्यात दहशतवादी हल्ले करण्याचा होता सनातन संस्थेचा कट; ATS ने चार्जशीटमधून गेला खुलासा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 04:39 PM IST

मराठी पुस्तक 'क्षात्र धर्म' यात हिंदू राष्ट्राची व्याख्या सांगितली आहे. या पुस्तकाने आरोपी प्रेरित आहेत.

 • Sensational disclosure In ATS Charge sheet Claim Accused plot blast in Mumbai and Pune

  मुंबई- नालासोपाऱ्यातील एका घरात अवैध पद्धतीने स्फोटकांचा साठा बाळगल्याप्रकरणी दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी 6000 पानांचे आरोपपत्र कोर्टात सादर केले. मुंबई, पुण्यासह देशभरात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्यासारखे स्‍फोट घडविण्याचा सनातन संस्थेचा कट होता. एटीएसने पहिल्यादाच सनातन संस्‍थेचा थेट आरोपपत्रात उल्लेख केला आहे.

  काय आहे एटीएसने सादर केलेल्या चार्जशीटमध्ये?

  आरोपी हे सनातन संस्था (गोव्यात मुख्यालय), आणि त्यांची सहयोगी संस्था 'हिंदू जागृती' तसेच या सारख्या इतर संघटनांचे सदस्य आहेत. आरोपी तथाकथीत हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याच्या प्रयत्नात होते. मराठी पुस्तक 'क्षात्र धर्म' यात हिंदू राष्ट्राची व्याख्या सांगितली आहे. या पुस्तकाने आरोपी प्रेरित आहेत. विशेष या पुस्तकाचे प्रकाशन सनातन संस्थेने केले होते, असे एटीएसने चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

  तथाकथित हिंदू धर्म, रुढी-परंपराविरोधात बोलणे, लिहिणार्‍यांना टार्गेट करण्यासाठी पिस्तूल, बॉम्बचा वापर करून स्फोट घडविण्याचा कट या टोळक्याने रचला होता. तसेच सामन्य जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचाही या टोळक्याचा हेतू होता, असेही चार्चशीटमध्ये म्हटले होते.

  डिसेंबर, 2017 मध्ये पुण्यात आयोजित वेस्टर्न म्युझिक कॉन्सर्ट सनबर्न फेस्टिव्हल सनातनचे टार्गेट होते, असे चौकशीत समोर आले आहे. एटीएसने सांगितले की, 7 ऑगस्टला पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपार्‍यात राहाणारा एक गट मुंबई आणि पुण्यात दहशतवादी हल्ले करणार होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

  चार्जशीटमध्ये शरद काळसकर (25), वैभव राऊत (44), सदभावना गोंढलेकर (39), श्रीकांत पांगारेकर (40), अविनाश पवार (30), लीलाधर उखिरडे (32),वासुदेव सूर्यवंशी (19), सुचित कुमार रंगास्वामी (37),भारत कुरणे (37), अमोल काळे(34), अमित बड्डी (27) आणि गणेश दशरत मिस्किन (28) यांचा समावेश आहे.

  या सगळ्यांना पालघर जिल्ह्यातील नालासोपाला, पुणे, औरंगाबाद आणि राज्यातील इतर ठिकाणाहून पोलिसांनी अटक केली होती.

Trending