आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई, पालघर, ठाण्यात तेरा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई आणि परिसरात तेरा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधम तरुणाला अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी गुरुवारी दिली. रेहान कुरेशी (३०) असे नराधमाचे नाव असून तो कंपनीत सेल्समनचे काम करतो. आरोपी रेहान हा मीरा राेड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. 


ठाणे, पालघर, नालासोपारा, मुंबई आणि इतर परिसरात त्याने गुन्हे केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. रेहान सुरुवातीला एखाद्या ९ ते १५ वयाेगटातील मुलीचा पाठलाग करायचा. त्यानंतर मुलगी घरात गेल्यानंतर दार वाजवून तो मुलीला वडिलांनी बाेलावल्याचे सांगून तिला निर्जनस्थळी न्यायचा. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करायचा. अशा प्रकारे त्याने अनेक मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत बलात्काराच्या १३ तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...