आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील उच्चभ्रू परिसरात सेक्स रॅकेटवर छापा, 4 परदेशी तरुणींसह 6 जणींची सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विमाननगर परिसरात एका थार्इ स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या उच्चभ्रू वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांच्या पथकाने संबंधित स्पा सेंटरवर छापा टाकून थायलंडमधील 4 आणि मेघालयातील 2 अशा 6 तरुणींची सुटका केली आहे.

 

याप्रकरणी पोलिसांनी थार्इ स्पा सेंटरचा मालक स्वप्निल संजय गायकवाडला (33) अटक केली आहे. त्याचा साथीदार आकेंद्रसिंह खैदेमविरोधातही विमानतळ पोलिस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. चारही विदेशी तरुणी पर्यटक व्हिसावर पुण्यात आल्या होत्या. त्यांना नोकरी देण्याचे आमिषाने बळजबरीने वेश्याव्यवसायास लावण्यात आले होते. शिवाय, या धंद्यातून मिळणाऱ्या पैशावरून गायकवाड मौजमजा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुटका करण्यात आलेल्या तरुणींना हडपसरमधील सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. विमानतळ पोलिस याबाबत पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...