Home | Maharashtra | Pune | Sharad kalaskar an Accused Dr.Dabholkar Murder Case has been Sent CBI Custody till September-10

गावठी बॉम्ब बनविण्यात, शस्त्र हाताळण्यात शरद कळसकर तरबेज; CBI ची पुणे कोर्टात माहिती

प्रतिन‍िधी | Update - Sep 05, 2018, 07:43 AM IST

शरद कळसकर हा बॉम्ब बनवण्यात पारंगत आणि शस्त्र हाताळण्यात तरबेज असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

  • Sharad kalaskar an Accused Dr.Dabholkar Murder Case has been Sent CBI Custody till September-10

    पुणे- नालासाेपारा येथे वैभव राऊत याच्या घरी एटीएसने छापा टाकून मोठ्या प्रमाणात बाॅम्ब अाणि शस्त्रसाठा जप्त केला हाेता. याप्रकरणी अाैरंगाबाद येथील शरद कळसकर या तरुणाला अटक करण्यात अाली. सीबीआयने कळसकरला अंनिसचे संस्थापक डाॅ.नरेंद्र दाभाेलकर खून प्रकरणात ताब्यात घेऊन मंगळवारी न्यायालयात हजर केले.


    डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्यावर शरद कळसकरने दाेन गाेळ्या झाडल्या असून त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा सीबीअायचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी या वेळी . शरद कळसकर हा बाॅम्ब बनवण्यात पारंगत अाणि शस्त्र हाताळण्यात तरबेज असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. दरम्यान, न्यायालयाने कळसकर याला १० स्पटेंबरपर्यंत सीबीअाय काेठडीत ठेवण्याचे अादेश दिले अाहेत.


    सचिन अणदुरे, कळसकरला प्रकरणात विनाकारण गोवले
    सीबीअायने अटक केलेल्या अणदुरेची १४ दिवस सीबीअाय काेठडी घेऊनही गुन्ह्यात वापरलेले शस्त्र किंवा दुचाकी जप्त केलेली नाही. अणदुरेला घटनास्थळावर नेऊन नवीन थिअरी मांडण्याचा प्रयत्न सीबीअाय करत अाहे. मात्र, सीबीअायने अाॅगस्ट २०१६ मध्ये न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल करून दाभाेलकरांची हत्या सारंग अकाेलकर व विनय पवार यांनी केल्याचे नमूद केले होते. अणदुरे व कळसकर यांना विनाकारण गोवल्याचा दावाही वकीलांनी केला.

Trending