आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचे सावट..वाढदिवस साजरा न करण्याचा शरद पवारांचा निर्णय, दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत देशवासीयांवर संकट आलेले असताना शरद पवार यांनी आपला वाढदिवस साजरा केलेला नाही.

मुंबई- अपुऱ्या पावसामुळे राज्यावर यंदा भयंकर दुष्काळाचे सावट आहे. ही बाब लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वाढदिवशी कोणताही समारंभ कार्यकर्त्यांनी आयोजित करू नये, असे निर्देश दिले आहेत. वाढदिवसानिमित्त एखादा समारंभ आयोजित करण्याऐवजी त्यासाठी लागणारा निधी आर्थिक मदतीच्या स्वरूपात दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांना द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांचा येत्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असून आजपर्यंतच्या आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत देशवासीयांवर संकट आलेले असताना शरद पवार यांनी आपला वाढदिवस साजरा केलेला नाही. त्यामुळे यंदाही कार्यकर्त्यांनी कोणताही कार्यक्रम आयोजित न करता आपल्या भागातील शेतकऱ्यांना शक्य असेल ती मदत करावी, असे पाटील यांनी म्हटले आहे. लोकसभा अधिवेशनाच्या कालावधीतच त्यांचा वाढदिवस येत असला तरीही आपल्या वाढदिवशी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, असेही राष्ट्रवादीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...