आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीना बोराच्या जैविक वडिलांकडे मुंबईला येण्यासाठी नाहीत पैसे, हत्याकांड प्रकरणी साक्ष न दिल्याचे सांगितले हे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिद्धार्थ दास हे शीनाचे जैविक वडील आहेत.
मुंबई- बहुचर्चित शीना बोराप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शीनाच्या जैविक व‍डिलांना सुनावणीसाठी कोर्टात  उपस्थित राहता आले नाही. मुलीच्या हत्येप्रकरणी त्यांची साक्ष कोर्टात नोंदविण्यात येणार होती. मात्र, मुंबईला येण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे.


विशेष सरकारी वकील भारत बादामी यांनी विशेष सीबीआय न्यायाधीश जे.सी.जगदाळे यांना सांगितले की, सिद्धार्थ दास हे शीनाचे जैविक वडील आहेत. ते कोर्टात साक्ष देण्यासाठी कोलकाताहून मुंबईला येणार होते. मात्र, त्यांच्याकडे भाड्याचेही पैसे नसल्याने त्यांना मुंबईला येता आले नाही. यासाठी सरकार त्यांच्या येण्या-जाण्याचा तसेच मुंबईत त्याच्याळ राहण्याचा खर्च करणार आहे.

 

दरम्यान, इतर साक्षीदार केदार याने कोर्टात साक्ष दिली. केदार हा कंपनीचा तत्कालीन कर्मचारी होता. विशेष म्हणजे केदार याने ती कार खरेदी केली होती, ती शीनाच्या हत्येसाठी वापरण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...