रिकाम्या खुर्चीला हार / रिकाम्या खुर्चीला हार घालून शिवसेनेचे आंदोलन..मंत्री स्वपक्षाचा असतानाही वैद्यकीय अधिकारी मिळेना

Nov 02,2018 07:57:00 PM IST

यावल- ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारीच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून शहर शिवसेनेने शुक्रवारी आंदोलन केले. राज्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण खाते शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेलाच हा घरचा आहेर असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

ग्रामीण रूग्णालयात कायम वैद्यकिय अधिकारी मिळावा, यासाठी शिवसेनेकडून निवेदन देवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मंत्री आपल्या पक्षाचा, पण तालुका कार्यकर्त्यांचे काही चालेना!, अशी अवस्था शिवसेनेची झाली आहे.

दरम्यान, ग्रामीण रूगणालयात मागील काही महिन्यांपासून वैद्यकिय अघिकाऱ्याचे पद रिक्त आहे. कायम वैद्यकिय अधिकारी मिळावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून कमालीची धडपड सुरू आहे. या तसहिलदारांना निवेदन देवून शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी शिवसेना कार्यकर्त्यांनी रुग्णालयात आंदोलन करुन वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार टाकून निषेध करण्‍यात आला.

अनेक दिवसांपासून निवासी डॉक्टर नाही. याबाबत शिवसेना सातत्याने पाठपुरावा करीत आहे वास्तविक भाजप-सेना युतीच्या या सरकारमध्ये आरोग्यमंत्र‍िपद शिवसेनेकडे आहे. डॉ. दीपक सावंत हे आरोग्य मंत्री आहेत. स्वत:हाच्या पक्षाच्या नेत्यांकडे मंत्रिपद असताना शिवसेनेकडून हे एका प्रकारे घरचाच आहेर म्हणावे लागले. मंत्री स्वपक्षाचा असताना देखील रूग्णालयात डॉक्टर मिळत नाही, ही तालुका व शहर शिवसेनेसाठी खूप लाजीरवाणी बाब म्हणता येईल.

आंदोलनावेळी शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शहर उपप्रमुख संतोष धोबी, किरण बारी, मोहसीन खान, आदिवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसेन तडवी, युवासेनेचे शहर उपअधिकारी सागर बोरसे, शकील पटेल, पिंटू कुंभार, विजय कुंभार, शेख रईस शेख रशीद, शेख अजहर, शेख जुनेद सह मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.

सामन्य जनतेसाठी तळमळ...

आंदोलनादरम्यान जगदीश कवडीवाले यांनी मोबाइलद्वारे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. जयकर यांचेशी संपर्क साधला. वैद्यकिय अधिकारी अभावी रुग्णांना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांना आवश्यक दाखले मिळविण्यात येणार्‍या समस्यांबाबत माहिती दिली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

X