आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले..ब्राह्मण मुख्यमंत्री पंचांग बघून मंत्रिमंडळ विस्तार करतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत. पंचांग बघूनच ते मंत्रिमंडळाचा विस्तार करतील, असे वक्तव्य करून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. राहू-केतू बघूनच मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा मूहूर्त काढतील, असेही गुलाबराव पाटील यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.


गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मागील विस्तारात माझा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. आता त्यांच्या पक्षातील, त्यांच्या डोक्यातील कोण आहेत हे पाहावे लागेल. आता मुख्यमंत्री पंचागाच्या आधारे ते कधी मुहूर्त काढतात, यावर आता मंत्रिमंडळ विस्तार अवलंबून आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आधी पेट्रोल पंपावरच्या पोस्टरवर मोदींसोबत वृद्ध महिला दिसायची आता मॉडेल दिसते.

बातम्या आणखी आहेत...