टी-1 वाघिणीचे बछडेही / टी-1 वाघिणीचे बछडेही माणसांची शिकार करण्यात सहभागी; शूटर नवाब शफात अलीचा धक्कादायक खुलासा

Nov 07,2018 03:02:00 PM IST

नागपूर- अवनी अर्थात टी-1 वाघिणीला ठार केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्य सरकारवर चौफर टीका होत आहे. आता नरभक्षक वाघिणी अवनीला (टी-1) ठार करण्यात सहभागी असलेल्या हैदराबादचा शूटर नवाब शाफत अली खान याने प्रतिक्रिया दिली आहे.

अवनी वाघिणीच्या दोन बछड्यांचाही माणसांची शिकार करण्यात सहभाग होता, असा धक्कादायक खुलासा अली यांनी केला आहे.

अवनीचे बछडे सब अॅडल्ट म्‍हणजे 10 ते 11 महिन्यांचे आहेत. अर्थात ते शिकार करण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाघिणीचे बछडेही नरभक्षक होऊ शकतात, असा दावा अली खान याने केला आहे.

अली यांनी सांगितले की, सब अॅडल्ट अवस्थेत बछड्यांमध्ये शिकार करण्याची मानसिकता तयार होत असते. बछडे अवनीसोबतच जंगलात फिरत होते. या दरम्यान अवनीने माणसांची शिकार केली. एवढेच नाही तर वाघिणीने माणसांना खाल्ले देखील आहे. शिकार करताना बछडे तिच्यासोबत होते. त्यामुळे बछडेही भविष्यात नरभक्षक होतील, अशी भीती अली यांनी व्यक्त केली आहे.

राजकीय वातावरण ढवळून निघाले...

नरभक्षक वाघिणीचे मृत्यू प्रकरण थेट दिल्लीत पोहोचले असून भाजप मंत्र्यांमधील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्य सरकारवर थेट आरोप केले आहेत. दुसरीकडे, राज ठाकरे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. याआधी जयंत पाटील, आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी भाजप सरकारसह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला होता.

X