आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 सप्टेंबरपासून श्राद्ध पक्ष सुरु, पितरांच्या कृपेसाठी या गोष्टींचे अवश्य करा पालन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 25 सप्टेंबरपासून महालया म्हणजे श्राद्धपक्ष सुरु होत आहे. या दिवसांमध्ये करण्यात आलेल्या तर्पणाने पितर देवता प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरातील सुख-समृद्धी कायम राहते. श्राद्ध पक्षामध्ये शास्त्रानुसार आहार आणि दिनचर्येत काही बदल करणे आवश्यक आहे. श्राद्ध काळात लसूण, गाजर, कांदा किंवा खाण्याच्या ज्या पदार्थामध्ये रस आणि गंध असेल, असे सर्व पदार्थ वर्जित आहेत.


खाऊ नये लसूण आणि कांदा
शास्त्रानुसार लसूण आणि कांदा तामसिक अन्नपदार्थ आहेत. तामसिक पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या विचारातील पावित्र्य नष्ट होऊ शके, स्वभाव रागीट बनतो. मन एकाग्र होत नाही. श्राद्धाचा काळ पूजा आणि ध्यानासाठी श्रेष्ठ सांगण्यात आला आहे. या कर्मासाठी मनाची एकाग्रता आणि पावित्र्य असणे आवश्यक आहे. यामुळे श्राद्ध काळात हे पदार्थ खाणे वर्ज्य सांगण्यात आले आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, श्राद्ध पक्षाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...