Home | Maharashtra | Mumbai | Singapore Airlines Flight Stranded for 8 hours at Mumbai Airport

बॉम्बची अफवा.. मुंबई एअरपोर्टवर तब्बल 8 तास रोखले सिंगापूर एअरलाइन्सचे विमान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 04:07 PM IST

मुंबईहून सिंगापूरला जाणारे सिंगापूर एअरलाइन्सच्या (एसआयए) एका विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने गोंधळ उडाला.

  • Singapore Airlines Flight Stranded for 8 hours at Mumbai Airport

    मुंबई- मुंबईहून सिंगापूरला जाणारे सिंगापूर एअरलाइन्सच्या (एसआयए) एका विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने गोंधळ उडाला. यामुळे मुंबई एअरपोर्टवर सदर विमान तब्बल आठ तास रोखण्यात आले. प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. भारतीय सुरक्षा यंत्रणेची तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमान शनिवारी सकाळी 8 वाजता सिंगापूरकडे रवाना झाले.

    बॉम्बची अफवा..

    विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) विमानाची कसून तपासणी केली. मात्र, बॉम्ब ठेवल्याची अफवा निघाली. दरम्यान, सिंगापूर एअरलाइन्सच्य प्रवाशांना रात्र मुंबई विमानतळावरच काढावी लागली.

    अधिकार्‍यांनी सांगितले की, विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन एअर इंडियाच्या कॉल सेंटरला आला होता. 'एसक्यू 423' हे विमान शुक्रवारी रात्री 11 वाजून 40 मिनिटांला उड्डान घेणार होते. मात्र, विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर विमानाचे उड्‍डाण रोखण्यात आले होते.

Trending