पुण्याच्या गाढविणीचा इंटरनेटवर / पुण्याच्या गाढविणीचा इंटरनेटवर बोलबाला..सिंगिंग टॅलेंटमुळे सोशल मीडियावर सगळ्यांनाच लागला लळा

  • RESQ ने गाणविणीचे नाव एमिली असे ठेवले आहे

Dec 08,2018 12:35:00 PM IST

पुणे- म्हणतात ना..! 'पुणे तिथे काय उणे', सध्या इंटरनेटवर पुण्यातील एका गाढविणीचा बोलबाला सुरु आहे. 'ढेंचू-ढेंचू' अशा सुरात गाणे म्हणणार्‍या या गाढविणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पाहाणार्‍या असे वाटते की, ही गाढवीण एखादे गीत गुणगुणत आहे.

दरम्यान, जगभरातील अनेक देशांमधीलही असे प्रकार समोर आले आहेत. आयलंडमधील एक गाढवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अशाप्रकारे व्हायरल झाला होता.

पुण्यातील एनजीओ RESQ सध्या या गाढविणीची देखभाल करत आहे. RESQ ने तिचे नाव एमिली असे ठेवले आहे. एनजीओचे सदस्य टीना मोहनदास यांनी सांगितले की, एमिली ही पुण्यातील रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत सापडली होती. तिने एका पिलालाही जन्म दिला होता. परंतु नंतर तिचे पिलू दगावले होते. तिला सेंटरमध्ये आणण्यात आले. सुरुवातीला ती कोणालाही जवळ येऊ देत नव्हती. नंतर मात्र ती कूल झाली.

एनजीओच्या अध्यक्षा नेहा पंचामिया यांनी सांगितले की, गाढव आनंदी असते, तेव्हा ते गाणे गुणगुणत असते. परंतु, असे रिसर्चमधून समोर आलेले नाही. वेटेनरी डॉ.जया भरत यांनी नेहा पंचामिया यांच्या वक्तव्याला सहमती दर्शवली आहे.

X