Home | Maharashtra | Mumbai | SIT Says Gauri Lankesh Murder Case in Final Stage Of Inquiry

गौरी लंकेश हत्या प्रकरणी दोन महिन्यांत आरोपपत्र; तपास अंतिम टप्प्यात, SITची माहिती

वृत्तसंस्था | Update - Sep 05, 2018, 06:46 PM IST

हिंदुत्वविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी राजराजेश्वरी नगरातील त्यांच्या घराजवळ

  • SIT Says Gauri Lankesh Murder Case in Final Stage Of Inquiry

    बंगळुरू- प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या-पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असून दोन महिन्यांत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती विशेष तपास पथकातील (एसआयटी) ज्येष्ठ अधिकारी एम. एन. अनुचेत यांनी बुधवारी दिली.

    हिंदुत्वविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी राजराजेश्वरी नगरातील त्यांच्या घराजवळ हत्या झाली होती. त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) बी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या पथकाने 12 जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्यांपैकी काहींचे संबंध सनातन संस्था आणि तिच्याशी संलग्न असलेल्या हिंदू जनजागृती समितीशी असल्याचा आरोप आहे.

    दरम्यान, वृत्तसंस्थेशी मंगळवारी बोलताना गौरी लंकेश यांची बहीण कविता लंकेश म्हणाल्या की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या बुद्धिप्रामाण्य वाद्यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेचा सहभाग सिद्ध झाल्यास तिला इतर दहशतवादी संघटनांसारखी वागणूक देण्यात यावी.

    कविता यांनी एसआयटीने केलेल्या अटकसत्राबद्दल तसेच गोविंद पानसरे, डॉ. दाभोलकर तसेच एम. एम. कलबुर्गी या बुद्धिप्रामाण्य वाद्यांच्या हत्याऱ्यांना पकडण्यासाठी सीबीआय आणि इतर तपास संस्थांना मार्गदर्शन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले होते.

Trending