Home | Maharashtra | Mumbai | Six Months Fee Pass For Retired ST Employee in Maharashtra

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना खुशखबर.. 6 महिने पत्नीसह मोफत प्रवास; परिवहनमंत्र्यांची घोषणा

प्रतिनिधी | Update - Sep 13, 2018, 07:17 AM IST

एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वर्षातील सहा महिने पत्नीसह मोफत प्रवासाचा पास देण्यात येणार आहे.

  • Six Months Fee Pass For Retired ST Employee in Maharashtra

    मुंबई- एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वर्षातील सहा महिने आपल्या पत्नीसह मोफत प्रवासाचा पास देण्यात येणार असल्याची घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी केली. गेली कित्येक वर्षे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून ही मागणी हाेत हाेती, ती गणेशाेत्सवाच्या ताेंडावर रावतेंनी पूर्ण केली.


    एसटी महामंडळाचे सुमारे १ लाख ४ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी सुमारे ४ हजार कर्मचारी निवृत्त होतात. सेवेमध्ये असताना दररोजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष देता न आल्याने किमान निवृत्तीनंतर तरी कुटुंबासमवेत आनंदाचे चार क्षण घालवावेत, सपत्नीक धार्मिक - पर्यटन, देवदर्शन, नातेवाइकांना भेटावे यासाठी प्रवास हा अनिवार्य आहे. परंतु परिस्थिती अगदीच बेताची असल्याने दळणवळणासाठी एसटीशिवाय पर्याय नाही. ज्या एसटीची ऐन उमेदीत प्रामाणिक सेवा केली त्या एसटीतून निवृत्तीनंतर धार्मिक व इतर पर्यटनासाठी प्रवास करण्याची ‘सशुल्क’ का असेना पण सवलत मिळावी, अशी विनंती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी रावते यांच्याकडे केली होती.


    गेल्या अनेक दिवसांपासून हाेत असलेल्या या मागणीची दखल घेत रावतेंनी निवृत्त कर्मचाऱ्यांना उतारवयात वर्षातून सहा महिने आपल्या पत्नीसह मोफत प्रवास करण्याचा पास देण्याचा निर्णय घेतला अाहे. या निर्णयास एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी संमती दिली. रावते यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Trending