दीपिकाची करिअची 11 / दीपिकाची करिअची 11 वर्षे : 'ओम शांती ओम' नव्हे 'हॅपी न्यू इयर' पहिला चित्रपट, वाचा 15 Facts

दिव्य मराठी वेब टीम

Nov 09,2018 12:32:00 AM IST

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणला इंडस्ट्रीत पदार्पण करुन आज 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर 2007 रोजी दीपिकाचा 'ओम शांती ओम' हा पहिला चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला होता. 11 वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकाने यशोशिखर गाठले आहे. शाहरुख खानसोबत 'ओम शांती ओम'मधून दीपिकाने रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण केले. हिमेश रेशमियाच्या एका म्युझिक अल्बममध्ये फराह खानने दीपिकाला पाहिले होते. तिथेच फराहने दीपिकाला तिच्या सिनेमासाठी साइन करण्याचे ठरवले. मात्र हा सिनेमा 'ओम शांती ओम' नव्हता.

'हॅपी न्यू इयर'साठी झाली होती दीपिकाला विचारणा...
फराह खान त्यावेळी 'ओम शांती ओम' या सिनेमावर नव्हे तर 'हॅपी न्यू इयर' या सिनेमावर काम करत होती. याच सिनेमासाठी फराहने दीपिकाला विचारणा केली होती. सर्वकाही जुळून आले होते. पण काही कारणास्तव 'हॅपी न्यू इयर' सिनेमा पुढे ढकलण्यात आला आणि फराहने 'ओम शांती ओम' सिनेमा करायचे ठरवले. मग दीपिकाला या सिनेमासाठी फराहने फायनल केले. त्यामुळे 'हॅपी न्यू इयर'ऐवजी 'ओम शांती ओम' या सिनेमातून दीपिकाचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. विशेष म्हणजे 2007 मध्ये 'ओम शांती ओम' सिनेमा रिलीज झाला आणि त्याच्या सात वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये 'हॅपी न्यू इयर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळी या सिनेमासाठी दीपिका नाही तर कतरिनाला फराहची पसंती होती. पण कतरिना 'धूम 3' आणि 'बँग बँग' या सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी होती. तिच्याकडे फराहसाठी तारखा नव्हत्या. म्हणून फराहने 'ओम शांती ओम'च्या टीमसोबत 'हॅपी न्यू इयर' करायचे ठरवले.

दीपिकाविषयीच्या अशाच आणखी काही रंजक गोष्टी आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या दीपिकाच्या आयुष्यातील रंजक फॅक्ट्स...

X
COMMENT