आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी बोट बुडाली, \'शिवसंग्राम\'च्या कार्यकर्त्याचा बुडून मृत्यु, 24 जणांना वाचवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील नियोजित भव्य स्मारकाच्या पायाभरणी समारंभाला जाताना स्पीड बोटीला अपघात होऊन शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याचा बुडून मृत्यू झाला. बोटीतील २४ जणांना वाचवण्यात यश आले. बुधवारी सायंकाळी सव्वाचार वाजता नरिमन पाॅइंट येथून साडेतीन किमी अंतरावर समुद्रात हा थरार घडला. दरम्यान, बोटीचा चालक अत्यंत वेगाने बोट चालवत होता त्यामुळेच अपघात झाल्याचे बोटीतील लाेकांनी सांगितले. 

 

पायाभरणीसाठी २ स्पीड व २ पॅसेंजर अशा ४ बोटी गेटवेवरून जेट्टीवरून निघाल्या. एक बोट किनाऱ्यापासून ३ किमी समुद्रात खडकावर आपटून बुडू लागली. बोटीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ओएसडी श्रीनिवास जाधव, शिवस्मारक प्रकल्पाचे अभियंता श्याम मिसाळ व शिवसंग्रामचे २० कार्यकर्ते होते. जाधवांनी आमदार जयंत पाटलांना फोन केला. पाटील यांनी तत्काळ मदतीसाठी २ बोटी पाठवल्या. दरम्यान, तटरक्षक दलाची २ हेलिकाॅप्टर्स आली. पीएनपीच्या दोन बोटीही अपघातस्थळी पोचल्या. सर्व पीएनपीच्या बोटीत चढले. तोवर एक जण समुद्रात बुडाला. बोटीतील अनेकांनी लाइफ जॅकेट घातले नव्हते, अशी माहिती आहे. 

 

बुडालेला सिद्धेश पवार सांताक्रुझचा रहिवासी 
सांताक्रुझ येथील शिवसंग्रामचा बुडालेला कार्यकर्ता सिद्धेश पवार याचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मूळचा कोकणातील खेडचा तो रहिवासी आहे. त्याचा मृतदेह बुडालेल्या बोटीत सापडला. पवार याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. विक्रांत आमरे (५०), अशोक लोधा (५३) हे दोघे बुडालेल्या स्पीड बोटीत होते. दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ते गंभीर होते. त्यांच्यावर सेंट जाॅर्ज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

 

अपघातग्रस्त बोटीत असलेले श्रीनिवास जाधव यांनी सांगितलेली आपबीती त्यांच्याच शब्दात.. 
'केवळ नशीब बलवत्तर, मित्र-नातेवाइकांच्या सदिच्छा व जयंत पाटील पाठवलेल्या मदतीमुळेच जीव वाचले. अन्यथा आम्हा २२ जणांचे काही खरे नव्हते. आमचे जीव वाचले असले तरी शिवसंग्रामचा एक कार्यकर्ता बुडाला. चालक अत्यंत वेगाने बोट चालवत होता. सव्वाचारच्या सुमारास दोन नंबरच्या सिग्नलवजळ एका खडकावर आमची बोट आपटली आणि मागच्या बाजूला फुटली. बोटीत पाणी शिरू लागले. काही जण घाईने पाणी उपसण्याचा प्रयत्न करू लागले. आम्ही सगळेच बोटीच्या पुढच्या बाजूला गेलो. पाणी वाढतच होते. लाइफ जॅकेट घेण्यासाठी सर्वांचीच चढाओढ सुरू झाली. फोनची रेंज असल्याने मदतीसाठी आम्ही तातडीने नौदल व अन्य विभागांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. जयंत पाटील यांच्याशी माझा चांगला संपर्क असल्याने मी त्यांना फोन करून परिस्थिती सांगितली. त्यांनी दहा मिनिटांत दोन बोटी आमच्या सुटकेसाठी पाठवल्या. त्यामुळे बोटीतील इतरांचे प्राण वाचले.' 

 

प्रवासी क्षमता होती ८ची, बसले २५ जण... 
खुल्या समुद्रात फायबरची स्पीड बोट नेली जाते तेव्हा त्यात ८ पेक्षा अधिक प्रवासी नसायला हवेत. पण या बोटीत २५ जण होते. क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्याने बोटीला अपघात झाला असावा, असे पीएनपीचे मालक आणि शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी सांगितले. 
नियोजनात अचानक ठरलेली चौथी मोटार बोटच नेमकी उलटली. 

 

तीन बोटींची व्यवस्था; चौथी कुठून आली? 
शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभासाठी शासनाने तीन बोटींचे नियोजन केले होते. मात्र एेनवेळी चौथी स्पीड बोट कुठून आणली, कोणी मागवली आणि त्यात क्षमतेपेक्षा अधिक अधिकारी-कार्यकर्ते कोणी बसवले, असा प्रश्न आहे. कार्यक्रमासाठी तीनच बोटींचे नियोजन होते. एक बोट व्हीआयपीसाठींची स्पीड बोट होती. त्यात राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि प्रकल्पाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे होते. इतर मोठ्या दोन बोटी प्रवासी बोटी होत्या. त्यातील एका बोटीत ४० पत्रकार तर दुसऱ्या बोटीत २५ पत्रकार आणि शिवसंग्रामचे काही कार्यकर्ते होते. जी चौथी बोट अचानक आली तीच नेमकी बुडाली. ती बोट कुठून, कोणी मागवली, तसेच बोटीची क्षमता ८ प्रवाशांची असताना २५ कार्यकर्ते-अधिकारी कसे काय बसले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

 

स्मारकाची जागा चुकीची
शिवस्मारकाची जागा चुकीची निवडली आहे. त्या परिसरात सर्वत्र खडक आहे. मच्छीमारही तिकडे जात नाहीत. निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही तयारी नसताना प्रकल्प अध्यक्ष विनायक मेटे यांनी हा कार्यक्रम घाईने घडवून आणला, असा आरोप मुंबईतील मच्छीमार संघटनेचे नेते दामोदर तांडेल यांनी केला आहे.

 

क्षमतेपेक्षा अधिक लोक
खुल्या समुद्रात फायबरीची स्पीड बोट नेली जाते, तेव्हा त्यात ८ पेक्षा अधिक प्रवासी नसायला हवेत. पण, या बोटीत 25 जण बसले होते. क्षमतेपेक्ष अधिक लोक बसल्याने बोटीला अपघात झाला असावा, असे पीएनपीचे मालक आणि शेकाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी सांगितले.

 

बुडालेला सांताक्रजचा
बुडालेला सिद्धेश पवार (वय-20) हा सांताक्रूझचा रहिवासी आहे. मूळचा कोकणातील खेडचा तो रहिवाशी आहे. विनायक मेटे संस्थापक असलेल्या शिवसंग्राम संघटनेचा तो कार्यकर्ता आहे. त्याचा मृतदेह बुडालेल्या बोटीत नेव्हीच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

 

दोघे गंभीर
विक्रांत आमरे (50), अशोक लोधा (53) हे दोघे बुडालेल्या स्पीड बोटीत होते. दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ते गंभीर झाले होते. त्यांच्यावर सेंट जाॅर्ज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 

नशीब बलवत्तर म्हणून 22 जण वाचले...जयंत पाटील यांनी लगेच पाठवली मदत
केवळ नशीब बलवत्तर, मित्र-नातेवाईकांच्या सदिच्छा आणि जयंत पाटील यांनी वेळेवर पाठवलेल्या मदतीमुळेच आमचे जीव वाचले. अन्यथा आमच्या बोटीतील 22 जणांचे काही खरे नव्हते. आमचे जीव वाचले असले तरी शिवसंग्रामचा एक कार्यकर्ता बुडाला. त्याचा शोध सुरु आहे. तो सुखरूप सापडावा एवढीच देवाकडे प्रार्थना.

 

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी दुपारी होता. यासाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि 30-35 पत्रकार निघाले होते. दुपारी 3.30 च्या सुमारास गेट वे ऑफ इंडियावरून तीन बोटी शिवस्मारकाकडे निघाल्या. एका स्पीड बोटीत विनायक मेटे आणि अन्य पदाधिकारी एका बोटीत पत्रकार होते. आमच्या बोटीत शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि काही अधिकारी होते.

 

बोटीचा चालक अत्यंत वेगाने बोट चालवत होता. सव्वाचारच्या सुमारास दोन नंबरच्या सिग्नलवजळ एका खडकावर आमची बोट आपटली. मागच्या बाजूला फुटली. बोटीत पाणी शिरू लागले. काही जण घाईने पाणी उपसण्याचा प्रयत्न करू लागले. आम्ही सगळेच बोटीच्या पुढच्या बाजूला गेलो. पाणी वाढतच होते. लाईफ जॅकेट घेण्याची चढाओढ सुरू झाली. फोनची रेंज असल्याने मदतीसाठी आम्ही तातडीने नौदल आणि अन्य विभागांना संपर्क साधण्यास सुरुवात केली. जयंत पाटील यांच्याशी माझा चांगला संपर्क असल्याने मी त्यांना फोन करून परिस्थिती सांगितली. त्यांनी दहा मिनिटात दोन बोटी आमच्या सुटकेसाठी पाठवल्या. त्या बोटी आमची बोट बुडण्या अगोदर आल्याने लगेचच सगळ्यांना त्या बोटींमध्ये चढवण्यात आले. आमचा जीव वाचला. जयंत पाटील यांनी मदत पाठवली नसती तर काय झाले असते त्याची कल्पना करवत नाही.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...