पुण्यातील बुधवार पेठेत / पुण्यातील बुधवार पेठेत बक्षीस घेण्यासाठी गोविंदा पथक येताच स्टेज कोसळले.. अनेक जखमी

दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळून 14 ते 15 जण जखमी झाले. बुधवार पेठेत सोमवारी रात्री ही घटना घडली. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Sep 04,2018 12:53:00 PM IST

पुणे- दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळून 14 ते 15 जण जखमी झाले. बुधवार पेठेत सोमवारी रात्री ही घटना घडली. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

बुधवार पेठेतील डिस्को बिल्डींगच्या शेजारील शिवाजी तरुण मंडळाच्या दहीहंडीचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरु होता. बक्षीस घेण्यासाठी एक गोविंदा पथक मंचावर आले असता अचानक स्टेज कोसळले. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने स्टेज कोसळल्याचे बोलले जात आहे. मंडळाचे 14 ते 15 कार्यकर्ते जखमी झाले. त्यापैकी 4 ते 5 जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

X
COMMENT