आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्र प्रदेशमधील महिलेकडून मुंबईत विक्रीसाठी आणलेले 523 स्टार कासव केले जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- आंध्र प्रदेशमधील महिलेकडून विक्रीसाठी आणलेले 523 स्टार कासव ठाणे पोलिसांनी जप्त केले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर (कुर्ला) पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. वन्यजीव कायद्यांतर्गत स्टार कासव पाळणे गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


मिळालेली माहिती अशी की, आंध्र प्रदेशमधील एक महिला गुरुवारी (ता.6) हे कासव घेऊन मुंबईत विक्रीसाठी घेऊन आली होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा विविध भागात या कासवांची डिलिव्हरी केली जाणार होती. ही महिला लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरली तेव्हा तिला सापळा रचून वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि ठाणे वन्यजीव विभागाच्या डीव्हीजनने अटक केली. तिच्याकडून 523 स्टार कासव जप्त करण्‍यात आले आहे. पोलिसांनी तिला कोर्टात उभे केले असता 11 सप्टेंबरपर्यंत तिला पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

पाठीवर सोनेरी रंगाची चांदणी..
पाठीवर सोनेरी रंगाची चांदणी असलेल्या कासवांना शुभ मानले जाते. फेंगशुईसाठी तसंच अंधश्रद्धा म्हणून घरात किंवा कामाच्या ठिकाणी स्टार जातीचे कासव पाळले जातात. धक्कादायक म्हणजे जादूटोण्यासाठीही या कासवांचा वापर केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवांना मोठी किंमत मिळते.

बातम्या आणखी आहेत...