आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य शासनाचा 'प्रताप'.. सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात संभाजी महाराज यांचा दारुड्या असा उल्लेख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- शालेय शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या सर्व शिक्षा अभियानाच्या एका पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांचा दारुड्या असा उल्लेख करण्‍यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. डॉ. शुभा साठे लिखित 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात हा आक्षेपार्ह मजकूर प्रकाशीत झाला आहेत. त्यामुळे राज्य शासनाचे सर्व शिक्षा अभियानाचे हे पुस्तक वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.

 

काय आहे हा आक्षेपार्ह मजकूर...?

'रायगडावरून संभाजीराजांनी केलेले अनेक खर्‍या खोट्या अत्याचाराच्या बातम्या कानावर येत होत्या. संभाजी महाराज हा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. त्याने अष्टप्रधान मंडळीतील थोण मंडळींची न भुतो न भविष्यती अवस्था केली होती. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंतकरण तिळ तिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्त्यव्याची टोचणी लावत होता. अखरे संभागी राजांना एक प्रदीर्घ पत्र लिहिले,' अशा मचकूर या पुस्तकात छापण्यात आली आहे. पुस्तकातील या छापलेल्या मजकुराविषयी संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदविला आहे. तमाम शिवप्रेमी व शंभुप्रेमींच्या भावना दुखवण्याचा प्रकार शि‍क्षण विभागाने केला आहे. समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात संभागी महाराज यांची जाणीवपूर्वक व ठरवून बदनामी करण्‍यात आल्याचा आरोपी संभागी ब्रिगेडने केला आहे.

 

शालेय अध्यासक्रमातील पुस्तकात अशा प्रकारचा मजकूर छापला जातो, हे राज सरकारचे दुर्दैव आहे. सर्व शिक्षा अभियानातील हे पुस्तक तत्काळ रद्द करून, संबंधित पुस्तकाशी संबंधित अधिकार्‍यांवर तसेच लेखक, प्रकाशकावर कारवाई करून सर्वावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्‍याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

 

नागपूरमधील लाखे प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकातील पान क्रमांक 18 वर संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...