Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | State Minister Pankaja Munde will Address At Dasara Melava in Savargaon Ghat

भगवानबाबांनी नगरमधून बीड जिल्ह्यात सीमोल्लघंन केले, वाघाच्या पोटी वाघिणीचा जन्म- पंकजा मुंडे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 18, 2018, 07:33 PM IST

पंकजा मुंडे यांनी प्रथमच भगवानबाबांच्या जन्मगावी अर्थात सावरगाव घाट येथे यंदा प्रथमच दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे.

 • State Minister Pankaja Munde will Address At Dasara Melava in Savargaon Ghat

  बीड- राष्ट्रसंत भगवानबाबा यांची 25 फूट उंच मूर्ती आणि स्मारकाचे गुरुवारी दसर्‍याच्या मुहुर्तावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अनावरण करण्‍यात आले. पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मगावी अर्थात सावरगाव घाट येथे यंदा प्रथमच दसरा मेळावा घेतला.

  भगवानबाबांनीनगर जिल्ह्यातून बीड ज‍िल्ह्यात सीमोल्लंघन केल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. 'भगवानभक्ती गड' या नावाने हे स्मारक भविष्यात ओळखले जाईल, भाविकांनी दर्शन येथून शक्ती घेऊन जायची आहे, असेही त्या म्हणाल्या.

  पंकजा मुंडे यांनी सांगितले की, भगवान बाबांच्या स्मारकाबाबत काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली. परंतु जो शब्द दिला होता तो आज पूर्ण केला आहे. भगवानशक्तीगड हा माझ्या एकटीचा नाही तर तुम्हा सगळ्यांचा आहे. गोपीनाथ मुंडे हे वाघ होते. वाघाच्या पोटी वाघिणीचा जन्म झाला. ऊसतोड कामगार ही माझी व्होट बॅंक नाही. कुठल्याही पदाची लालसा नसल्याचेही त्यांनी सांगितले. ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करणार असल्याची घो‍षणाही यावेळी करण्यात आली.


  ऊसतोड कामगारांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर करण्‍यात येणार आहे. ऊसतोड कामगार महामंडळ उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही. काही विरोधक मुंडे साहेबांच्या पश्चातही मला त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले भक्तीचा बाजार मांडणं संतांनी शिकविले नाही. तर पुणे, शिर्डीत घरकुल योजनेतून ऊस तोड कामगारांनी घरे दिली आहेत.

  2019 मध्ये भाजपच्या विजयाची घंटा वाजणार

  राज्यात 2019 मध्येही भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व्हे बघून मते मिळत नाहीत तर माणसं बघून मते मिळतात, असा शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही काम करतो तुमच्या पोटात काय दुखते, असाही टोला लगावला. आम्ही करमणुकीचे कार्यक्रम घेत नाही. तसेच मी कोणालाही कशालाही घाबरत नाही. लपून छपून वार करू नका, समोर येऊन वार करा, असे आव्हानही पंकजा यांनी यावेळी केले.

  या मेळाव्यापूर्वी संत भगवानबाबांच्या भव्य 25 फूट उंच पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. या शिल्पाची निर्मिती नगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केली आहे. 20 मीटर व्यासाच्या जलकुंभात 'बैसोनि पाण्यावरी - वाचिली ज्ञानेश्वरी' या संकल्पनेवरील संत भगवानबाबांचे ज्ञानेश्वरी पारायण करतानाचे हे शिल्प आहे. तळघरात भगवानबाबांच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत. हे स्मारक 2 एकरांवर आहे. सावरगावात गतवर्षीपासून भगवानबाबांच्या प्रेरणेतूनच पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा सुरू केला. गेल्या वर्षी त्यांनी बाबांचे जागतिक दर्जाचे शिल्प उभारण्याची घोषणा केली होती, ती या वर्षी पूर्णत्वास आली. या निमित्ताने सावरगावचे ग्रामस्थ गुढी उभारून आणि रांगोळी घालून पंकजा मुंडेंच्या स्वागतास सज्ज आहेत.

  दुसरीकडे खासदार प्रितम मुंडे यांनी गोपीनाथ गड ते सावरगाव घाट अश रॅलीला सुरुवात झाली आहे. ही रॅली थोड्याच वेळात सावरगाव घाट येथे दाखल होणार आहे.

  पंकजा मुंडे यांचे भावनिक आवाहन..

  संघर्षाच्या वाटचालीमध्ये सीमोल्लंघनाचा उत्सव आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. मी येत आहे तुमच्यासाठी, आपल्यासाठी, तुम्ही पण या!!, असे भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.


  दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडावर मेळावा घेण्यावरुन वाद झाला. पुढे एक वर्ष भगवानगडावर दसरा मेळावा संपन्नही झाला. मात्र त्यानंतर दसरा मेळाव्यासारख्या चांगल्या सोहळ्यावरुन वाद व्हायला नको, म्हणून पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगाव या गावी दसरा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

Trending