आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांचे निधन; आज वांगदरीत अंत्यविधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगाेंदे- राज्य साखर संघाचे अध्यक्ष, श्रीगोंदे तालुक्याचे माजी आमदार, शिवाजीराव नारायणराव नागवडे (८५) यांचे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता दीर्घ अाजारामुळे निधन झाले. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता वांगदरी (ता. श्रीगोंदे) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामागे पत्नी, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, दीपक नागवडे ही २ मुले व ३ मुली असा परिवार आहे. 


नागवडे हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. १९७० मध्ये त्यांनी ढोकराई माळरानावर नगर दक्षिणमधील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. १९७८ आणि १९९९ मध्ये त्यांनी श्रीगोंदे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. श्रीगोंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदीप शिक्षण संस्था व तुळजाभवानी शिक्षण संस्था सुरू केल्या. राज्य साखर संघाचे ते विद्यमान अध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...