Home | Divya Marathi Special | Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

असा असतो वेश्येच्या आयुष्यातील संघर्ष.. कधीच वाचली नसेल अशी भन्नाट कथा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 12:01 AM IST

माजातील काही गोष्टींकडे तर आपण जाणून बुजून दुर्लक्ष करत असतो. त्यापैकीच एक म्हणजे वेश्या.

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  आपल्या आजुबाजुला समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. पण त्याकडे आपण सगळेच फारसे गांभीर्याने पाहतो असे नाही. त्यात समाजातील काही गोष्टींकडे तर आपण जाणून बुजून दुर्लक्ष करत असतो. त्यापैकीच एक म्हणजे वेश्या.


  वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना नेहमीच त्यांच्याप्रती हीन दृष्टीकोनाचा सामना करावा लागतो. पण वेश्या बनण्यामागे नेहमीच एक वेदनादायी कथा असते. पण वेश्या व्यवसाय करत असताना त्यांना प्रकर्षाने या वेदनांचा सामना करावा लागत असतो. सामान्य लोकांना या वेदना दिसत नाही. मात्र लेखक किंवा कवी यांना मात्र निरीक्षणातून बरेच काही व्यक्त करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळेच ते त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अशांच्या वेदना मांडू शकतात.

  जागतिक सेक्स वर्कर्स डेच्या निमित्ताने, अशीच एका वेश्येची व्यथा मांडणारी कथा आम्ही याठिकाणी देत आहोत. लेखक श्रीकांत सराफ यांनी लिहिलेल्या या कथेमध्ये केवळ आपल्या कुटुंबाच्या आजच्या दिवसाचा प्रश्न कसा सुटेल याचा विचार करणारी एक वेश्या आणि दिवसभरातील तिच्या मनातील विचारांचा चढउतार यशस्वीपणे मांडण्यात लेखकाला यश आले आहे. समाजातील अनेक वेश्यांची रोजचीच ही कहाणी असू शकते. चला तर मग पाहुयात काय आहे ही कथा..


  देह देवदान
  अजगराच्या आतड्यासारखी पसरलेली अंधारी बोळ तिच्या अगदी सरावाची झाली होती. कोणी रुमालाने बांधून डोळे झाकले तरी ती सहज बोळ पार करू शकली असती. पंधरा-वीस हात लांबीची बोळ संपली की धुरकट झालेल्या, झिजलेल्या लाकडी पाय­या. प्रत्येक पायरीवरील पोत्याची पायपुसणी.


  नाव प्रिन्स पॅलेस असलं तरी तिथं ना कधी प्रिन्स येई ना इथल्या खोल्या पॅलेससारख्या.
  इथं येणारे-जाणारे लोकच वेगळे. प्रत्येकाचे चेहरे वासनांनी रंगलेले. वखवखलेले, पेटलेले, भुकलेले लोक येथे दुपारपासून येतात आणि पेटलेल्या भट्टीत लाकडानं स्वतःला झोकून द्यावं तसं भडभडून पडतात.


  पुढील स्लाइड्सवर वाचा, अगदी काही मिनिटांत या वेश्येचा जीवनपट आणि तिच्या संघर्षाची व्यथा मांडणारी उर्वरित कथा...


  (सर्व फोटो - प्रतिकात्मक)

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  रेल्वे स्टेशनच्या पाठीलाच लागून पॅलेसची भिंत. दररोजच्या वीस-पंचवीस रेल्वेगाड्या, पाच पन्नास मालगाड्या धडधडून जातात. तेव्हा पॅलेससोबतची दहाबारा हॉटेलं, खानावळी दमेक­यासारख्या खोकतात. त्याचीही तिला सवय झालीय. 

   

  पण ती पहिल्यांदा गि­हाईकासोबत आली तेव्हा फार घाबरली होती. त्यात तो कॉलेजचा पोरगा होता. तिच्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी लहान. तेव्हा थेट तिस­या मजल्यावर तिला रेल्वेचा हादरा जाणवला होता. तोही दचकला होता. पण हळूहळू भीती गेली. आता तर हादरे नसले तर तिला मजाच येत नव्हती. 

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  गेल्या काही वर्षापासून ती न चुकता येत होती इथं. तिची चप्पल उंच टाचेची. अणकुचीदार टोकाची. नेहमीच नव्या फॅशनच्या चपला घालायची आवड. पायपुसण्यातला चिखल कधी तिच्या पायाला लागला नाही. अंधा­या बोळीत कधी पाय लडखडले नाही तिचे. फक्त चपलेच्या टाचाचे टोक निमुळते होत गेले आणि ब्लाऊजच्या पाठीचा, गळ्याचा आकार वाढत गेला.

   

  प्रिन्स पॅलेसवर कितीही पटवून आणलं असलं तरी सोबतचा माणूस नाराज होतो बोळीत पाऊल ठेवताना. नवखा असेल तर चीड-चीड करतो तो. समजता समजत नाही. मग कमरेत हात घालून,  एखादवेळी थेट त्याच्या खिशातून खाली स्पर्श करत आणावं लागतं त्याला. एखादा तर पैशातही कमी करायला बघतो. ती देखील काही कमी नाही म्हणा. गोड बोलून, गळ्यात हात टाकून, मुरका मारून पैसा काढून घेण्याची टॅक्ट जमवून घेतली आहे तिनं. गि­हाईक बोळीत आलं की त्याच्याशी लगट करत त्याला गरम करायचं, ते अभ्यासासारखं पाठ केलं होतं. 

   

  अलिकडं या पाठांतराचीही तिला कंटाळा आलाय. तेच लोक. तेच चेहरे. त्याच अंधारलेल्या खोल्या. काळपट पडदे. हिरवे, पिवळे दिवे. तोच धंदा. थोडासा पैसा पदरात पाडून घेण्यासाठी दिवसरात्र परेशानी. अधून-मधून पोलिस आहेतच. त्यांच्यासाठी कधी पैसे तर कधी रात्र काळी. पोलिस स्टेशनच्याच खोलीत. सुरुवातीला झाला त्रास. पण आता सगळंच अंगवळणी पडलंय. 

  घरी दोनशे आणि खर्चायला शंभर रुपये मिळवायचे एवढंच डोक्यात ठेवून घराबाहेर पडते ती. पूर्वीची गोष्ट वेगळी होती तिची. हजार-दीड हजार अगदी दोन हजार पण मिळायचे. नोटांच्या गादीवरच झोपावयाचे काहीजण. म्हणून तर दोन खोल्यांचं घर झालं. पोराला ब­यापैकी शाळेत टाकता आलं. बापाचं दवाखान्याचं एवढं मोठं बिल एकाच फटक्यात मोकळं झालं. 

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  त्या काळात ती कारमधूनच फिरायची. कधी मालकाची तर कधी ट्रॅव्हल्सची. त्यावेळी तिला वाटायचं की हे असंच सुरू राहील. पैसा कमी होऊन होऊन किती कमी होईल. हजाराऐवजी पाचशे मिळतील. दोनाच्याऐवजी चारजण गाठावे लागतील. पण तिला वाटलं तसं कधीच तिच्या आयुष्यात घडलं नाही. अगदी दहावीत भेटलेल्या वसंतापासून ते तीन वर्षापूर्वी कुंकू पुसलं जाण्यापर्यंत.

  बरा चालला होता संसार. रिक्षावरून टेंपो घेतला होता प्रकाशनं. आपल्यालाही घराबाहेर फार पडायची गरज राहिली नव्हती. त्यानं अटच घातली होती ना लग्नापूर्वी. तरीही कधी पैशाची नड पडली तर जावंच लागायचं पण ते आपल्या मनावर होतं. पैसा मनासारखा मिळत असला तरच जायचो. तेही देवाला मान्य झालं नाही. टेंपो उडवून टाकला ट्रकनं.

  सगळं आठवायला तिला वेळ नव्हता. इच्छाही नव्हती. तिनं मागं घडून गेलेल्या सगळ्या काळ्याकुट्ट घटनाचं गाठोडं बांधलं अन् थुंकीची लांबलचक पिचकारी सोडली.
  तेवढ्यात मागून आवाज आलाच गुल्ल्याचा.

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  छाया... ओ छाया चहा घ्यायची का? 
  रोज काय विचारतोस. ठेव काऊंटरवर. 
  वैतागलेल्या आवाजात तिनं उत्तर दिलं. तिला त्याच्याशी बोलण्याचा कंटाळा आला होता. पण प्रिन्स पॅलेसमध्ये घडणा­या सगळ्या घटना-घडामोडीची माहिती तिला गुल्ल्याकडूनच कळणार होती. त्यामुळं त्याला टाळणं कठीण होतं.

  साडेअकरा वाजले तरी सेठ अजून काऊंटरवर आला नव्हता. गेल्या चार-पाच दिवसांपासून भेटलाच नव्हता. तिची नेहमीची तिस­या मजल्यावरची चांगली खोली तिला अलिकडं मिळत नव्हती. त्या मागं नेमकं काय कारण हे तिला गुल्ल्याच सांगू शकत होता. 

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  चहाचा ग्लास ठेवताच तिनं त्याच्यावर नजर रोखली. पदर खांद्यावरून पूर्ण घसरू देत डावा डोळा किंचित बारीक करत म्हणाली, 
  "काय रे, सेठ कुठंय चार-पाच दिवसापासून. रोज मी त्याला विचारून जातीय. मोबाईलही उचलत नाही माझा. पैसे पण दिले नाहीत माझ्या वाट्याचे. काय गावाला गेलाय की काय.'
  मजबूत हाडपेराचा, किंचित बसकं नाक असलेला गुल्ल्या चेह­यावरची रेषही न हलवता तिच्या समोरच्या सोफ्यात रेलला. "स्साली चार वर्षापूर्वी अंगाखाली आली असती तर जिंदगीत तहलका झाला असता. आता पार उतरलीय. शंभर-दोनशेचं गि­हाईक मिळवण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर फिरावं लागतंय हिला.’ 

  हा आपल्याशीच एैश करायला बघतोय, हे तिच्या नजरेवरून लक्षात आलं. पण दुसरा पर्याय पण नव्हता. ती उठून सरळ त्याच्या बाजूला जाऊन बसली. अगदी चिटकून. नवीन पोरींची चटक लागलेल्या गुल्ल्याला त्या चाळीस बेचाळीस पावसाळे-उन्हाळे ओलांडून गेलेल्या शरीरात रस उरला नव्हता. तो पटकन् उठत म्हणाला,
  "चला, मला खोल्या आवरायच्यात. तुझ्या बाजूला बसलो तर कामंच होणार नाही.' त्याच्या अशा उठून जाण्यानं छायाचं डोकं भडकलं होतं. 

  चाळीशी ओलांडली म्हणून हॉटेलमधल्या स्वयंपाक्यानं, आपलीच भाड खाणा­यानं आपल्याला झटकून टाकावं? चेह­यावर सुरकुत्या नाहीत आपल्या. पोटावर थोडं टायर वाढलंय. डोळ्याखाली काळी रेष दिसतीय. पण फिगर काही एवढी कामातून गेलेली नाही. बेडवर तिघांना भारी आपण. आणि हा गुल्ल्या तरी कोण? पोळ्या-भाज्या, चिकन-मटन करणारा. 
   
  सेठसोबत वीस वर्षापासून काम करतोय, या पलिकडं काय लायकी आहे त्याची. नुसता लाळ घोटत होता. फुकटात पाहिजे होतं त्याला सगळं. तरीही सगळा अपमान गिळत ती पुन्हा त्याच्याजवळ गेली. आवाजात आणखी गोडवा आणत म्हणाली
  ए, राजा...सेठ कुठं गेलाय. माझ्या नोटा ठेवल्यात का त्यानं. चल रुमची चावी तरी देऊन टाक ना. मी तयार होते.
  गुल्ल्यानं किचन बॉक्समध्ये लावलेली किल्ली काढून तिच्या अंगावर भिरकावली. 

  चांगली तयार होऊन ये. आज तीन तरी गि­हाईक झाली पाहिजेत.
  आँ, माझ्या गि­हाईकाची तुला काय काळजी. तीन मिळतील नाही तर दहा.
  दहा? तुला?
  का. केली नाहीत का मी? 
  ए...छाया...मला नको सांगू हां. आणलेली दहा गि­हाईकं तू कशी वाटी लावली ते. दारूच्या नशोत पोरांना तर काय झालं तेच कळत नव्हतं. फक्त ब्लाऊज उतरवताच गळून जात होती पोरं...
  ऐ धंद्यात बेईमानी केली नाही हां कधी. तुझा विश्वास नाहीये माझ्यावर...

  तुझ्यावर? वीस वर्षापासून धंद्यात असलेल्या बाईवर? एकेकाळी होता तुझा धंदा छाया. गि­हाईक तुला शोधत फिरत होतं. मुंबई, पुण्याहून येऊन घेऊन जायचे तुला. राजस्थान, दिल्लीचे सेठ लोक माणसं पाठवायचे. एसी कारनं, रेल्वे फस्र्ट क्लासनं  गेलीस तू त्यावेळी. पण आता तसं राहिलं नाहीये. एक्सपिरिअन्स एवढा झालाय तुझ्याकडं की तू आँटी व्हायला पाहिजे. पण तूच अजून तोंड मारत फिरते इकडं तिकडं. कॉलेजची पोरं पकडतेस. त्यांच्याकडून काय पैसे मिळणार. रात्रभराचा मोठा कस्टमर पाहिजे. तुझी, तुझ्या धगड्याची अन पोराची काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. कडवं प्रवचन आहे गुल्ला महाराजाचं. वाईट दिवस येण्याच्या आधीच शहाणी होऊन जा. पोरा-सोरांपेक्षा जरा म्हातारे, कारवाले पकड. पैसा जास्त अन् शरीरालाही त्रास कमी.

  असे अपमानाचे अनेक क्षण तिने पचवले होते. पोलिस ठाण्यात दोन रात्री ती नागडीच बसली होती. एकदा हैदराबादला तर इन्सपेक्टरीणबाईनंच मजा लुटली होती. नंतर मारहाण करून हैदराबादबाहेर आणून सोडलं होतं. तिथून दहा किलोमीटर चालत येऊन मग ती एका स्टॉलवाल्यासोबत रात्र घालवून परतली होती. त्यावेळी ती इन्सपेक्टरीण तोडक्या मोडक्या हिंदीत हेच तर सांगत होती. तिच्यापेक्षा गुल्ल्याचं बोलणं अधिक खुपणारं, दुखावणारं होतं. त्यात खरेपणा होता. गि­हाईक मिळवता मिळवता नाकीनाऊ येत होता तिला. दोन दिवसांपासून एकही जण फिरकला नव्हता. बसस्टँड, रेल्वे स्टेशनला चार-पाच चकरा झाल्या. कॉलेजेसपाशी घुटमळून पाहिलं. एक फालतू सिनेमाही पाहिला. पण नाहीच. सगळ्यांना कॉलेजच्या पोरीच पाहिजे होत्या. अन् कॉलेजच्या पोरांना कमी पैशात ट्रीपल सीट चालायचं होतं.

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  एक जबरदस्त सणक गेली तिच्या अंगातून. समोरच्या भिंतीवर लावलेल्या गणपती, लक्ष्मी, तिरुपतीच्या फ्रेमकडं तिनं त्वेषानं कटाक्ष टाकला. उद्या शांतारामला, पोराला जेवायला मिळालं नाही तर माझ्या घरात काही काम नाही तुमचं, तिनं देवांना बजावलं. अन् सारं अवसान एकत्र करत खोलीचं कुलूप उघडलं.

  शॉवरचं थंडगार पाणी अंगावर पडताच छायाच्या अंगात जणू नवं जीवन संचारलं. चेह­यावर हास्य उमटलं. ओलेत्या अंगानंच ती बाहेर आली. आरशासमोर उभी राहून स्वतःला न्याहाळू लागली. डोळ्याखाली बारीक काळसर रेष आली होती. पर्समधून लाली काढून तिनं रेषा पुसून टाकल्या. निळेशार लिपस्टीक ओठांना चोपडलं. डोळ्यांमध्ये भरपूर काजळ भरले. मग स्वतःलाच एक छानसा डोळाही घातला. केस विंचरून छान अंबाडा बांधला. मग कपाटातला छानसा काळपट हिरव्या रंगाचा, भल्या मोठ्या पाठीचा स्लीव्हलेस ड्रेस बाहेर काढून अंगावर चढवला. गॉगल कपाळावर खोचला. त्याच झोकात किल्ली गुल्ल्याच्या अंगावर फेकली आणि  त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत तिनं पाय­या उतरल्या.

  बसस्टँडवर गि­हाईक मिळणारच. तिला पक्की खात्री होती. पण गुल्ल्याचं बोलणं घुमत होतं. मोठं पाकिट पाहिजे. बसस्टँडवर सगळे खेडेगावातले. पन्नास शंभर रुपये जास्त देतील. गुल्ल्या स्साला. हरामी. छाया...छाया करून अंगचटीला येतो. मांडीवर बसवायला बघतो. पण अजून त्याला मी कळालेलीच नाही. माझं नाव छाया नाही. प्रभा आहे. प्रभावती दिलीप गोंदेकर. हेही त्याला 20 वर्षात कळालं नाही. पण या धंद्यात नावाला काय अर्थय म्हणा. छाया काय, माया काय, डॉली, शबनम, पारु, रेखा, सुनिता...सगळ्यांचं नशीब एकच. 

  तिच्या कपाळावर चिंतेचं जाळं पुन्हा तयार झालं. सेठ आता आला असेल हॉटेलवर. गुल्ल्या त्याचे कान भरत असंल. पैसा पाहिजे सेठला. सेठचंही बरोबर होतं. त्याला पोलिस, नगरसेवक, फुटकळ कार्यकर्ते सगळ्यांनाच पैसा द्यावा लागत होता. एखादा अगदीच ऐकत नसला तर पैशांनी तर तो एखादी पोरगी पाठवून देतो त्याच्याकडं. छायालाही दोन-तीन वेळा जावं लागलंच होतं. पण मजा आली. पैसाही मिळाला. रात्रभर परेशान करणा­या साहेबाला तिनं असंच पाठलाग करून एका हॉटेलात गाठलं. तो त्याच्या साहेब अन् मित्रासोबत होता. अलिकडच्या टेबलावर बसून कचकन डोळा मारला तर पंटरमार्फत पाचशेची नोट पाठवली होती त्यानं. 

  आता फार मोठा माणूस झालाय तो. तसा गठायला पाहिजे पुन्हा  एकदा. म्हातारपणी त्याची साथ मिळू शकते. पण त्यालाही बायका-पोरं आहेत. तो कशाला सांभाळेल आपल्याला. देव...तिच्या डोळ्यासमोरून रांगेने सा­या देवांच्या मूत्र्या येऊन गेल्या. तशी ती पचकन थुंकली. 

  चटचट पाय­या चढून बसस्टँडच्या भल्या मोठ्या बाजारात शिरली. ते हजारो लोकांनी भरलं होतं. दुपारचे दोन-अडीच वाजले होते. आपल्याकडं कोण कोण पाहतंय, हे कोप­यातून न्याहाळत तिनं चाल मंदावली. चेह­यावर हसू पांघरत ती मुद्दाम दोन चार जणांच्या अंगाला अंग घासून गेली. पण आज काय झालं होतं कुणास ठाऊक. कुणी फारसा प्रतिसाद दिला नाही. दहा-पंधरा मिनिटांत तिनं सगळे प्लॅटफॉर्म  धुंडाळले. पुस्तकाच्या दुकानासमोर घुटमळली. कँटीनमध्ये बसून एक कप चहा पिऊन पाहिला. तिकीटाच्या रांगेत उभ्या असलेल्या काही गावरान खेडूतांना डोळ्यांनी खुणावून पाहिलं. पण उपयोग होईना. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तिला हाच अनुभव येत होता. आता इथं थांबून फार वेळ जाईल, हे तिच्या लक्षात आलं. मग तिने तिच्या खात्रीच्या हॉटेलकडं नजर टाकली. दोन-चार जण बाहेर उभे होते. पण ते तिला भरवशाचे वाटले नाहीत. शिवाय त्यांच्या हातात प्लास्टिकच्या पिशव्या होत्या. म्हणजे त्यांना बाहेरगावी जायचे असणार. तासभर थांबायची अशांची तयारी नसते, हे अनुभवावरून तिला माहिती होते. 
  म्हणून ती थेट हॉटेलात शिरली. काऊंटरवर बसलेल्या बाबा पठाणला आदाब करून थेट कोप­यातील खास टेबलावर तिने पर्स फेकली. बेसिनपाशी जाऊन नळ सोडला. कोणत्या टेबलवर कोण बसलंय, ते आरशातून मागे पाहत न्याहाळून घेतलं. मग पर्समधून रुमाल काढला. पाणी पुसले. पुसता पुसता चौथ्या नंबरच्या टेबलावर माणसाकडे तीक्ष्णपणे पाहून एक डोळा बारीकही केला. काही क्षण तिने त्याच्या प्रतिसादाची वाट पाहिली. तो तिच्याकडे रोखून पाहातच होता. निम्मे काम झाले होते. तो ब­यापैकी पैसेवाला दिसत होता. दिसायला पण ठीकठाक होता. हा हातातून सुटला तर...विचारानेच तिचे मन थरथरले. मग तिने फारसा वेळ घालवला नाही. टेबलावर वसून तिने मुद्दाम वेटरला मोठ्याने एक गोल्डन चहा अशी ऑर्डर दिली. ते देत असताना गि­हाईकाकडे मंदसे स्मित फेकले. तसा तो घायाळ झाला. टक लावून तिच्याकडे पाहू लागला. पाच मिनिटात पुढचा व्यवहार पक्का. याला रिक्षातूनच घेऊन जाऊन पॅलेसवर, असेही तिने ठरवून घेतले. तेवढ्यात तो उठला. काऊंटरपाशी पोहोचला. तिला खुणावतच त्याने तिच्या चहाचे पैसे देऊन टाकले. तशी ती झटपट उठली. पर्स उचलून घेत त्याच्यापाशी जाऊन पोहोचली. तसा त्याचा चेहरा तिला अगदी स्पष्ट दिसला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. पूर्वीची ओळख असल्यासारखी. इतके गि­हाईक पाहिले. त्यात कुणाचाही चेहरा निरखून पाहण्याच्या भानगडीत ती कधी पडली नव्हती. पण तरीही य पाहिल्यासारखे वाटत होते. या अवघडलेल्या स्थितीतून त्यानेच तिची सुटका केली. 

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  मी सुरेश...सुरेश भाबळे...तुमच्या पलिकडं तीन गल्ल्या सोडून राहतो. प्रकाशसोबत आलो होतो मी तीन वर्षापूर्वी तुमच्या घरी. 
  हं...हरामी...तरीही अधाशासारखा बघत होता. आपल्याला दुरून लक्षातच आलं नाही. आणि आता याला कसं इथूनच कटवायचं. ती मनाशी बोलता बोलता त्याच्याशी लपवाछपवी करत बोलू लागली. एक तर हा ओळखीचा निघाला. हातातून निसटला. पंधरा-वीस मिनटं वाया गेली. नवा माणूस शोधावा लागणार. 
  हे इथं बसस्टँडवर आले होते. माझ्या मावशीची मुलगी होती ना धुळ्याला. तिला सोडायसाठी आले होते. बसवलं तिला बसमध्ये आणि तहान लागली म्हणून आले होते इथे तर इथेच चहा पिला. चला निघते मी.
  काऊंटरवर बसलेल्या बाबा पठाणलाही गडबड कळाली. पण सुरेशचं समाधान झालं नव्हतं.
  धुळ्याला कुठंय आता बस.
  हो. आहे तर. मी आताच बसवलं तिला.
  मी एसटीमध्येच आहे नोकरीला. धुळ्याच्या बसला अजून चाळीस मिनटं आहेत. 
  ती पूर्णपणे फसली होती. संतापाने डोक्याची शीर उडत होती. त्यात संध्याकाळच्या जेवणाची, पोराच्या फीसची काळजी. आता याला काय सांगावे. कसं सुटावे, हे तिला सुचेना. तेवढ्यात बाबा मदतीला आला धाऊन. 
  अरे साब, मॅडमने बसस्टँड के बाहर ही छोड दिया होगा, नही तो टॅक्सीमें बिठाया होगा...
  हा हा..टॅक्सीतच बसवलं मी. बससारखी होती ती. चला येते मी.

  काही मिनिटातच दोन जण गळाला लागले. मग तिनं थेट गळ्यापर्यंत हात घालत घाम पुसून काढला. मंगळसूत्र बाहेर काढून त्याच्याशी चाळा करत ते पुन्हा आत टाकलं. तसा समोरच्या माणसाचा डोळा चमकला. गठला. पैसेवालाही दिसतोय. दोन हजारापासून सुरवात करून हजारावर निपटू,असा विचार करत तिनं त्याला मैदानावर साचलेल्या बाभळीच्या झाडाकडं येण्याची खूण केली. ते धंदेवाल्या बायकांसाठी सुरक्षित ठिकाण होतं. 
  चलायचं का...
  बाभळीच्या झाडामागं...
  नाही. खास अॅरेजमेंट आहे.
  पण माल गरम आहे का.
  आहे तर तुझ्यासमोरच उभा आहे की...
  तू...? गरम? तुला गॅसवर ठेवलं तरी गरम व्हायची नाहीस. मलाच थंड करून टाकशील. जा दुसरी एखादी घेऊन ये. 
  असं इथं उभ्या उभ्या...कुणाचं थंड गरम कळतं का. त्याच्यासाठी बेडरुममध्ये मऊशार पलंगावर पडायला पाहिजे.
  तुझ्या घरी जायचं का
  घरी...माझ्या...कशाला. घरापेक्षा भारी व्यवस्था आहे.  
  मगाशी मंगळसूत्र खालून वर काढलं...पुन्हा आत टाकलं...तर...
  तर..काय
  मला वाटलं तुझा नवरा नाही घरी...असं सांगितलं तू..
  आँ...आयला मजाक करतो यार तू....बरं चल...इथं हॉटेलंय.
  हॉटेल...नको...हॉटेलात नाही परवडत
  अरे. फक्त दोन हजार..एकदम फूल एैश. तु जशी म्हणशील तशी.
  दोन हजार. जा दुसरीकडं बघ कुणाला तरी.
  हॉटेल एकदम खासंय.
  त्याला काय चाटायचंय का. मला काय घरी गादीवर झोपता येत नाही का रात्रभर?
  दीड हजार...बाराशे...एकदम...फायनल
  ऐ, एवढ्यात तर कॉलेजच्या कवळ्या पोरी मिळतात. 
  मग त्यांना घेऊन गावाबाहेर जावं लागतं. हॉटेलचा खर्च.
  अरे पण मजा. तुझ्यात अन् तिच्यात फरक किती...

  गि­हाईकाशी शब्दाचा खेळ खेळता खेळता छाया थकून गेली. घरातली रिकामी भांडी डोळ्यासमोर नाचू लागली होती. गांजाच्या नशेत शांताराम अंगावर पट्ट्याचे वार करतोय, असंही तिच्या डोळ्यासमोर दिसून गेलं. काहीही झालं तरी आज एक गि­हाईक झालंच पाहिजे, असं तिनं मनाला बजावलं. पाचशे रुपये पाहिजेतच. 
  चेह­यावर थोडेसे आणखी मादक भाव आणत, मंगळसूत्राशी खेळत, केसाची लांबसर बट आणखी उडवत तिने गि­हाईकाशी आणखी चाळा सुरू केला. 
  बघा, लास्ट सांगते. पाचशे रुपये. त्याच्यापेक्षा कमी पाहायची असंल तर झोपडपट्टीत जा समोरच्या. 
  आम्ही कशाला जावं झोपडपट्टीत. मला तर तूच पाहिजे. 
  मग चल की लवकर. कशाला वेळ घालवतो.
  माझ्याकडं फक्त शंभराची नोट आहे. त्याने खिशात हात घालून नोट तिच्यासमोर नाचवली. तो तिच्याकडे थंडगार डोळ्यांनी पाहू लागला. तशी छायाच्या डोक्यात जोराची सणक भरली. 

  एवढं सोन्यासारखं शरीर फक्त शंभर रुपयात. आतापर्यंत एवढी खालची वेळ कधी आली नव्हती. हरामी स्साला. बाईच्या शरीराची एवढी  कमी किंमत लावतोय. तिनं तटकन त्याच्याकडं पाठ फिरवली. तडातडा चालत शंभर-दीडशे फूट पुढं गेली. एकाएकी तिला वाटलं की तो पाठीमागून चालत येतोय.  तसा तिनं वेग थोडासा मंद केला. अंगावरचा पदर पूर्णपणे खाली पाडला. आणि तो उचलण्याचा मादक अंदाज घेत डोळ्याच्या  कोप­यातून मागे पाहिलं तर...तर तिथं कुणीच नव्हतं. प्रिन्सवर तिच्यासोबत धंदा करणा­या रेश्मा, सलमा, यास्मीन, मंदा, गौरी मात्र झाडाखाली बसून गप्पा करत गि­हाईकं शोधत होत्या. इशारे करीत हसत खिदळत होत्या. ते पाहून छायाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आपल्या हातून गि­हाईक गेल्याच्याच आनंदात हसतायत या. असं म्हणत तिनं एक बारीक दगड उचलला आणि त्यांच्या दिशेने भिरकावला. तशा त्या अजूनच खिदळू लागल्या. त्या सा­या छायापेक्षा पाच-सात वर्षांनी लहान होत्या. लग्न झाली असली तरी एकीलाही पोर-बाळ नव्हतं. संसाराचा फारसा ताप नव्हता.

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  मंदा ओरडली-
  छाया, एखादा म्हातारा पाहा. त्याच्याकडूनच मिळतील शंभर-दोनशे.
  रेश्मानं पण आवाज चढवला.
  तुला आता इकडं धंदा नाही. एखाद्या कॉलनीत जा. तिथल्या बंगल्यात राहणा­या म्हाता­यांना लागत असती बाई. ती बरकतपु­यातली काळी सुलू गेली होती. दोन रात्रीचे  हजार रुपये मिळाले. अन् म्हाता­यानं केलं तर काहीच नाही. कपडे काढले की ढँ...झाला. 
  रेश्मानं खरं तर हा किस्सा तिस­यांदा सांगितला होता, तरीही छायाला चिडवण्यासाठी त्या जोरजोरात खिदळल्या. 

  आता तिथं थांबणं शक्यच नव्हतं. एक प्रदीर्घ श्वास घेऊन छाया पुढं निघाली. का आपल्या नशिबी हे रांडेचं जगणं आलं. का नाही आपल्याला लहानपणी चांगले आई-बाप मिळाले. का नाही आपले आई-बाप आपण किमान तरुण होईपर्यंत जगले. का त्यांचं घर झोपडपट्टीतच होतं. का त्यांनी आपल्याला शाळेत शिकू दिलं नाही. आणि आपल्याला काकूकडे पाठवून आईनं स्वतःला का पेटवून घेतलं. बापानं आपल्याला शेजारच्या पोस्टातल्या शेळकेकडे पाठवून बाहेरून दरवाजा बंद करून घेतला. आपण  पण का शेळकेला अंगचटीला येऊ  दिलं. का त्याला चपलांनी बडवलं नाही. पोलिसांना का सांगितलं नाही. पोलिस बापाला पकडायला आले तेव्हा देवाची शप्पथ घेऊन खोटं का बोललो. बापानं पलंगाखाली गांजाची पिशवी लपवल्याचं पाहूनही ती शेजारच्या प्रकाशनंच ठेवल्याचा आरडाओरडा बापाच्या सांगण्यावरून का केला. एकसाथ शेकडो प्रश्न वादळासारखे छायाभोवती फिरू लागले. त्याचा वेग एवढा प्रचंड होता. की वा­याच्या झोतानं आपण उडून चालल्याचा भास तिला झाला. त्यामुळे ती थोडी भानावरही आली. तेव्हा सूर्य तिरपा होऊन तळपत होता. एकदम कडक. तिला भोवळल्यासारखं झालं. घशाला कोरड पडली होती. दुपारी तीनपर्यंत काहीच कमाई नाही. पुन्हा डोक्यात तोच विचार. कुठून आणायचं कुणाला. एखादा कॉलेजातला पोरगाही दिसेना. कुणी म्हातारा नजरेला पडेना. आज जणू काय सगळे कामपिपासू पुरूष संपावर गेले होते. कुणी तिच्याकडं ढुंकूनही पाहायला तयार नव्हतं.  

  तेवढ्यात समोरच्या रस्त्यावरून एक कार गल्लीत वळाली. चालविणा­यानं हलकेच काच खाली घेतली. बोटभरच. त्यातून माणिकचंदची रिकामी पुडी बारीक, चपटी करून कॅरमच्या स्ट्रायकरसारखी बाहेर भिरकावली आणि काच पुन्हा चढवली. तेवढ्या चार-पाच सेकंदात छायानं त्याला आणि त्यानं छायाला न्याहाळून घेतलं. सकाळपासून कार चालवत असल्यानं थकलेले त्याचे डोळे चमकले. छायानं डोळा थोडासा बारीक केला आणि त्याच्याकडे टोकदारपणे पाहिलं. त्याला खूण पटली.

  त्याला वाटलं इथंच कार थांबवावी. या बाईला गाडीत बसवावं आणि कारमध्येच शरीर शांत करून घ्यावे. तेवढ्यात बायकोचा चेहरा समोर आला. आधी मंदीरात जाऊन दर्शन घ्या...मग चहा, नाश्ता, जेवण करा, असं तिनं दोन-तीन वेळा बजावलं होतं. जागृत महादेव मंदीरात जाऊन प्रसाद घेऊन या. त्यामुळं आधी दर्शन करून, नारळ फोडायचं नंतर या बाईला शोधून काढू, असं मनाशी बोलत त्यानं झर्रकन गाडी मंदीराकडे वळवली. तत्पूर्वी तिचा चेहरा साईड ग्लासमधून न्याहाळून घेतला. तिचा आक्रमक, रापलेला चेहरा, कपाळावरचं दाट कुंकू, मुद्दाम सोडलेली केसाची बट, उघड्या पाठीच्या ब्लाऊजमधून दिसणारं गच्च शरीर त्यानं डोळ्यात भरून घेतलं. 

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  मंदीरात ब­यापैकी गर्दी होती. त्यामुळे सदानंदनं मंदीराच्या खूप अलिकडं कार लावली. पायी चालत तो निघाला. तेव्हा भिका­याच्या पोरांनी त्याला गराडा घातला. त्यांना वाटलं हा कार मालकच आहे. बोंबलत सुटलेल्या पोट्यांना हाकलून लावत तो मंदीरात पोहोचला. तेव्हा त्याचं लक्ष तिच्या येण्याकडंच होतं. त्यानं हलकेच डोळ्याच्या कोप­यातून नजर फेकली तेव्हा ती झपझप पावले टाकत येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. साहेबाला रात्री नऊ वाजता हॉटेलावर घ्यायला जायचे आहे. तोपर्यंत सगळं साध्य होईल. असा विचार त्याने केला. खिशातील पाकिट काढून पाचशेची नोट आहे की नाही, याची खात्री करून घेतली. मनाशी खुदकन हसत तो मंदीरात वळाला. 

  झपझप पावलं टाकीत छाया मंदीराच्या रस्त्यावर निघाली. आज मंगळवार. देवीचा वार. या महादेव मंदीराच्या जवळच रेणुकादेवीचं मंदीर होते. लग्न झाल्यावर ती आणि शांताराम दोन-तीन वेळा आले होते दर्शनाला. पुढं या धंद्यात पडल्यावर सगळंच संपत गेलं. पापात बुडालेलं शरीर घेऊन देवीपुढे कसं जायचं असाच प्रश्न पडत होता तिला. हळूहळू देवीचा आणि त्या प्रश्नाचाही विसर पडत गेला. 

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  आज महादेव मंदीराकडे निघाल्यावरही तो प्रश्न पुन्हा तिच्यासमोर आला. अनेक पुरुषाशी संग करून बाटलेलं आपलं शरीर. पैशासाठी धंदा करत असलो तरी कधी-कधी आपणही तीन चार जणांशी मनापासून रत झालोच होतो ना, याचीही तिला आठवण झाली. आपण शीलभ्रष्ट, शरीर भ्रष्ट, मन भ्रष्ट, विचार भ्रष्ट. आणि आता तर आपण गि­हाईकाला खेचून आणण्यासाठी मंदीरातच चाललो आहोत. काय हे...किती मर्यादा सोडली आपण. काही लाजच नाही आपल्याला. चक्क मंदीरात जाऊन त्या मोटारकारवाल्याला इशारा करायचे म्हणजे...आपली हद्दच झाली. नाही नाही...ते हातातून गेलं तरी चालंल. दुसरा कुणीतरी शोधू पण मंदीरात रंडीबाजी नाही. धंदा नाही करायचा. मंदीरातच जायचं नाही...तिनं ठरवलं...

  तसं एक छोटंसं पोरगं रडत रडत तिच्यासमोरून पळत गेलं आणि मंदीराच्या डाव्या बाजूला असलेल्या दाट झाडीत नाहीसं झालं. छायाच्या मनात कालवाकालव सुरू झाली. अरुणही याच पोराच्या वयाचा. आपण मागं लागून त्याला शाळेत पाठवतोय. फी भरली नाही म्हणून हाकलतील का त्याला. अन् संध्याकाळचं जेवण त्याचं. दोनशे रुपयाची सोय झालीच पाहिजे. हे गि­हाईक गेलं हातातून तर काही खरं नाही. देव गेला उडत. एवढीच काळजी माझी देवाला तर कशाला धंद्याला लावलं त्यानं मला. कशाला शांतारामसारख्या गंजेटीला पदरात मारलं. मी काय देवाचं नुकसान केलं होतं. आणि आता आणखी काय वाईट करणारंय ते करून घ्यावं देवानं...देवाला जसा त्याचा संसार महत्वाचा तसा मलाही माझा संसार महत्वाचा. मी काही देवळाच्या गाभा­यात शेज नाही सजवणार. मंदीराच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडीत घेऊन जाणारंय गि­हाईकाला. नाहीतर त्याच्याच गाडीत बसून जाईन तो म्हणंल तिथं. पण मला आज देवाच्या साक्षीनं देहदान करायचंय. मनात विचारांची वावटळ उडवतच छाया मंदीराच्या पाय­यांवर पोहोचली. उंच टाचेच्या सँडल काढून ठेवताना साडी खूपशी वर येईल. सदानंदची त्यावर नजर पडेल याची काळजी तिनं घेतली. त्याच्या डोळ्यातली चमकही तिनं टिपली. त्यानं डोळ्यावरचा गॉगल कपाळावर ठेवला आणि तिला हलकासा डोळा घातला. तिच्या अंगातून एकदम वारा शिरशिरुन गेला. कॉलेजमधला रविंद्र सातपुते तिच्या काळजावरून चालत गेला. त्याच्या सारखाच दिसतोय, असं पुटपुटत तिनं केसाची बट पुन्हा कानामागे अडकवण्याचं नाटक केलं. आणि ती झपकन गाभा­यात शिरली. महादेवाच्या मूर्तीसमोर हात जोडले असले तरी मन बाहेरच होतं. ते कसंबसं ताब्यात आणत तिनं देवाला सांगूनच टाकलं. 

  हे तुला पाप वाटत असलं तरी मला वाटत नाही. कारण हे मी माझ्या संसारासाठी करतेय. तुच या गि­हाईकाला इथं तुझ्या देवळात आणलंय. म्हणून मी त्याच्या मागंमागं इथं आलीय. उगाच मला शिक्षा करण्याच्या भानगडीत पडू नको, असं बजावून ती झपकन बाहेर पडली. 

  झाडाच्या दाट गर्दीत पाच मिनिटांतच सदानंद आणि छायानं शरीरं मोकळी केली. कपडे साफसूफ करून केस विंचरून छाया त्याच्याकडं पाहू लागली. आता हा बाबा पैसे देणार की नाही, असा तिचा अविर्भाव होता. तो ओळखत सदानंदनं तिच्या दिशेनं पैशाचं पाकिट भिरकावलं. प्रसंगावधान राखून पदराची झोळी करत तिनं ते पकडलं. तो म्हणाला,
  खरं तर मी पाचशे रुपये देणार होतो. पण आता विचार बदललाय. दोन हजार रुपये आहेत पाकिटात तेवढे घेऊन टाक.
  नाही नाही. जेवढे ठरले तेवढेच दे. मेहरबानी करायची गरज नाही. धंदेवाली असली तरी लुटारू नाही मी.
  मेहरबानी नाही. तुझी चव आवडली मला. माझ्याकडं येण्याआधी देवाच्या पाया पडून आलीस ना तू. ते पाहूनच मला कळालं तू कोण आहेस ते.

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

  आश्चर्यचकित झालेल्या छायाच्या तोंडून शब्दही फुटेनात.
  तिनं कसंबसं विचारलं –
  पण तू कोण आहेस.
  मी ड्रायव्हर आहे. एका साहेबाच्या गाडीवर. नेहमी येत असतो इथं.
  मग यापूर्वी कधी दिसला नाहीस. मी तर येत जात असते मंदीरासमोरून.
  मी पण नाही येत कधी या मंदीरात. कदाचित आज तुझ्या शरीराची चव घेण्याचं नशिबात होतं माझ्या. 

  आणि माझ्या नशिबात...असा प्रश्न छायाच्याही मनात आला पण गि­हाईकाच्या बोलण्यात फारसं अडकायचं नाही, हे तिनं यापूर्वीच ठरवलेलं आणि अंमलात आणलं होतं. आताही त्याच्याकडे चमत्कारिक आणि तुटलेल्या नजरेनं पाहात तिनं पुन्हा पायात सँडल चढवल्या. आता पायाचा थोडासाही भाग दिसू दिला नाही. पाठीवरून पूर्ण पदर घेत तिनं केसाचा अंबाडा बांधला आणि झोकदारपणे ती झाडीतून बाहेर पडली. मंदीराच्या बाहेरूनच महादेवाला हात जोडले. तेव्हा ती कमालीची शांत झाली होती. कोणताच विचार तिच्या मनात येत नव्हता. जणूकाय आपण आपला देह देवालाच दान केलाय, असा तिला भास होऊ लागला होता. त्या भासातच तिनं कधी मंदीराच्या पाय­या उतरल्या ते तिचं तिलाही कळालं नाही. हाताच्या मुठीत दोन हजाराच्या नोटा चिंब भिजत होत्या. 

  समाप्त...

 • Story by writer About Struggle Of Prostitute To Survive

Trending