आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जायकवाडी’त पाणी साेडण्याचा निर्णय उद्या: सुप्रीम काेर्टाचा स्थगितीस नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गाेदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अादेशानुसार जायकवाडीसाठी ८.९९ टीएमसी पाणी धरणांतून साेडण्याची नाशिक जिल्हा प्रशासनाने साेमवारी संपूर्ण तयारी केली. मंगळवारी सकाळी पाेलिस बंदाेबस्तात पाणी साेडण्याचा निर्णयही झाला. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने या प्रकरणी ३१ अाॅक्टाेबर राेजी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रशासनाने तूर्त पाणी साेडण्याचा निर्णय स्थगित केला. अाता बुधवारीच याबाबत अंतिम निर्णय हाेणार अाहे.  


समन्यायी पाणीवाटपाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक कोहिरकर यांनी गोदावरी खोऱ्यातील धरणांचे १५ ऑक्टोबर रोजीचे साठे विचारात घेऊन नाशिक-नगरमधून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले हाेते. मात्र, नगर व नाशिकमधून जायकवाडीत पाणी साेडण्यास तीव्र विराेध हाेत अाहे. नगर जिल्ह्यातील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे पाणी साेडण्यास स्थगितीची मागणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. कपिल सिब्बल म्हणाले, जायकवाडीत ४० टीएमसी पाणी असल्याने उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास स्थगिती द्यावी. दुसरीकडे, गेवराईचे माजी अामदार अमरसिंह पंडित यांनी अाक्षेप याचिका दाखल केली हाेती. पंडित यांचे वकील दिलीप तौर यांनी सांगितले की, ‘या याचिकेवर साेमवारी प्राथमिक सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्यांची पाणी साेडण्यास स्थगिती देण्याची मागणी मान्य केली नाही.

 

पुढील सुनावणी ३१ अाॅक्टाेबरला अाहे.’ मंगळवारी नाशिकमधून ३.२४ टीएमसी पाणी सोडण्याची तयारी होती. मात्र सर्वाेच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली. दरम्यान, जायकवाडीतील पाण्याचे अाॅडिट करण्याचा अादेश प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी दिले.

 

बातम्या आणखी आहेत...