आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही दिवाळीत हे फटाके फोडले तर तुम्ही अडकू शकतात कायद्याच्या कचाट्यात!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज डेस्क- दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच एक महत्त्वपूर्ण ‍निर्णय दिला होता. कोर्टाने फटाक्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी न आणता काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. अर्जुन गोपाल, आरव भंडारी,जोया राव भासिन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. वरिष्ठ वकील गोपाळ शंकरानारायण यांनी खटला लढविला होता.

 

सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय कितपत योग्य ठरेल? इकोफ्रेंडली फटाके कसे असतात? कोर्टाचे नियम मोडले तर का कारवाई होईल? हे जाणून घेण्याचा आमच्या टीमने प्रयत्न केला.

 

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय?
गोपाल शंकरनारायण यांनी सांगितले की, कोर्टाने फटाक्यांवर पूर्णपणे निर्बंध घातले नसले तरी दिलेला निर्णय हा अंत्यत काटेकोर आहे. दिवाळीत केवळ ईको फ्रेंडलीच फटाके फोडता येतील, असे कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटले आहे. बाजारपेठेत आणखी इकोफ्रेंडली फटाके विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. सरकारद्वारा अशा फटक्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. इकोफ्रेंडली व्यतिरिक्त आणखी कोणत्याही फटाक्यांचा वापर करता येणार नाही, या नियमांचे उल्लंघन केल्यास ते गुन्हा ठरेल. त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. 

 

कसे असतात इकोफ्रेंडली फटाके?  
भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटनाच्या (पेसो) परवानगीने इकोफ्रेंडली फटाके तयार केले जातील. त्याचे वजन देखील कमी असेल.  त्यामध्ये प्रदूषकतत्व आढळणार नाही. सामान्य फटाक्यांपेक्षा यांचा आवाज देखील कमी असेल. काही फटाक्यांमध्ये पाणी असेल. जेणेकरून प्रदूषण होणार नाही. फटाके बनवणाऱ्या कंपन्यांना पेसोच्या मंजुरी नंतरच फटाके निर्मितीची परवानगी दिली गेली आहे. पेसोच्या मंजुरीशिवाय फटाक्यांची विक्री देखील करता येणार नाही.

 

फटाके खरेदी करताना घ्या ही काळजी
फटाके खरेदी करताना ते फटाके पेसोद्वारा मान्यता प्राप्त आहेत की नाहीत, हे आधी पडताळून घ्या. पेसोची परवानगी असलेल्या फटाक्यांवर तशी नोंद असेल. पेसोची मान्यता नसलेले फटाके आपण खरेदी केले तर आपण गुन्हेगार ठरू शकतात. पोलिस तुम्हाला अटक करू शकतात. तसेच शिक्षाही होऊ शकते.

 

काय आहेत सुप्रीम कोर्टाचे नियम
- दिवाळीच्या दिवशी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास सूट दिली आहे. म्हणजे केवळ दोन तासच फटाके फोडता येतील.
- केवळ परवानाधारकांना फटाक्यांची विक्री करता येईल
- जास्त आवाज असणाऱ्या फटाक्यांना पूर्णपणे बंदी राहील. केवळ सुरक्षित फटाक्यांची विक्री केली जाईल.
- सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन न झाल्यास त्या परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षकांना जबाबदार ठरविण्यात येईल. 

 

शरीरासाठी घातक आहेत बाजारात आलेले फटाके
- 462 सिगारेट ओढणे जेवढे घातक आहे, तितकीच घातक एक नागगोळी आहे.  
- 34 सिगारेट ओढणे जितके घातक तितकेच घातक एक भुईचक्कर  
- 'इंडिया स्पेंड'च्या अहवालानुसार, एक फुलबाजी लावणे म्हणजे 74 सिगारेट ओढण्या एवढे घातक आहे.

बातम्या आणखी आहेत...