आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Surat Hare Krishna Exports Savji Dholakia To Give 600 Cars In Bonus To Employees

हिरे व्यापाऱ्याचे दातृत्व : सहाव्या वर्षीही 30 काेटी खर्चून 600 कारागिरांना कारची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - प्रसिद्ध हिरे व्यापारी सवजीभाई ढाेलकिया यांनी अापल्या कंपनीतील ६०० हिरे कारागिरांना दिवाळी बाेनस म्हणून कार तर ९०० कर्मचाऱ्यांना ‘एफडी’ची भेट दिली. गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच दरवर्षी कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देणाऱ्या ढाेलकिया यांच्या दातृत्वाचे काैतुकही केले. गेल्या सहा वर्षांपासून ते कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देत अाहेत.

 

सुरतमधील जेम अॅण्‍ड ज्वेलरी पार्क यूनिटमध्ये गुरुवारी सकाळी 9 वाजता झालेल्या कार्यक्रमात कोर्‍या करकरीत गाड्या कर्मचार्‍यांना देण्यात आल्या. याच वेळी दिल्लीत एक दिव्यांग महिलेसह चार कर्मचार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कारची चावी देण्यात आली. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सच्याच्या माध्यमातून सुरतमधील कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सुमारे 20 हजार लोक उपस्थित होते.

 

कंपनीचे मालिक सावजीभाई यांनी सांगितले की, यंदा स्किल इंडिया इन्सेंटिव्हमध्ये कंपनीतील 1500 कर्मचार्‍यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी पैकी 900 कर्मचार्‍यांना फिक्सड डिपॉजिट म्हणून मोठी रक्कम दिवाळी बोनस म्हणून देण्यात येणार आहे. तसेच 30 कोटी रुपये खर्च करून 600 कर्मचार्‍यांना दोन प्रकाराच्या कार (मारूतीची सॅलेरिओ आणि रेनॉल्डची क्विड) गिफ्ट करण्‍यात आल्या आहे. सावजीभाई यांनी यापूर्वी आपल्या कंपनीतील 1260 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केली होती तर 400 कर्मचाऱ्यांना घरखरेदी करण्यासाठी मदत केली होती.

 

1875 कर्मचार्‍यांना द‍िल्या आहेत कार...
- मागील चार वर्षांत कंपनीतील 5 हजार कर्मचार्‍यांना इन्सेंटिव्हचा लाभ मिळाला आहे. अातापर्यंत 1875 कर्मचार्‍यांना कार गिफ्ट करण्‍यात आल्या आहेत. कर्मचार्‍यांमधील कार्य कुशलता वाढविण्यासाठी सावजीभाई यांनी बंपर बोनस देण्याची परंपरा सुरु केली आहे. प्रत्येक कर्मचार्‍याला प्रति महिना 6 हजार रुपयांचा बोनही दिला जातो.

 

- 2014 मध्ये कंपनीने 491 कर्मचार्‍यांना कार, 503 कर्मचार्‍यांना ज्वैलरी आणि 207 कर्मचार्‍यांना 2 बीएचके फ्लॅट इन्सेंटिव्ह म्हणून देण्यात आला होता. डायमंड इंडस्ट्रीसह कार्पोरेट वर्ल्डमध्ये सावजीभाई यांची एकच चर्चा सुरु आहे. इन्सेंटिव्हवर कंपनीने 45 कोटी रुपये खर्च केले आहेत.

 

- 2013 मध्ये कंपनीने 70 कर्मचार्‍यांना इन्सेंटिव्ह म्हणून कार गिफ्ट केल्या होत्या. कंपनीने परफॉर्मेन्स क्रायटेरिया निर्धारित केला आहे. त्यात कर्मचार्‍यांची वर्तवणूक, कंपनीच्या विकासातील त्यांची योगदान आणि डायमंड कटिंगमधील व्हॅल्यू एडिशन या सारख्या निकषांचा त्यात समावेश आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... कोण आहेत सावजीभाई ढोलकिया?

 

बातम्या आणखी आहेत...