आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप महिला पदाधिकारी हत्याप्रकरण..संशयित आरोपीला पोलिसांनी लातूरमधून घेतले ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नालासोपारा येथील भाजपच्या महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण (32) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी लातूर येथून एका संशयित आरोपीला गुरुवारी (ता.11) रात्री ताब्यात घेतले आहे. नितीन चाफे असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. रुपाली चव्हाण यांच्या हत्येनंतर आरोपी फरार होता.

 

रुपाली यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहात होता नितीन

नितीन चाफे हा रुपाली यांच्या फ्लॅटवर पेईन्ग गेस्ट म्हणून राहात होता. अशी माहिती रुपाली यांच्या वडिलांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिस नितीनचा शोध घेत होते.

 

दरम्यान, मंगळवारी (2 अॉक्टोबर) रुपाली चव्हाण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. रुपाली यांना इस्त्रीचे चटके आणि इलेक्ट्रीक शॉक दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता.

 

रूपाली चव्हाण या भाजप युतीच्या वसई-विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. नालासोपारा पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटच्या बी विंग़मध्ये रूम नंबर 101 मध्ये त्या राहत होत्या. त्या घटस्फोटित होत्या. त्यामुळे त्यांचे वडील जवळच राहत होते.

बातम्या आणखी आहेत...