Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Suspicious Sound inside earth in Beed

बीड शहर गूढ आवाजाने हादरले..भूकंपाच्या अफवेने नागरिकांमध्ये भीती; भूकंप नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका-तहसीलदार

प्रतिनिधी | Update - Sep 13, 2018, 08:37 AM IST

संपूर्ण शहर बुधवारी सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊच्या सुमारास गूढ आवाजाने हादरले.

 • Suspicious Sound inside earth in Beed

  बीड- संपूर्ण शहर बुधवारी सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊच्या सुमारास गूढ आवाजाने हादरले. मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील काही नागरिकांनी मोकळ्या जागेवर जाऊन सुरक्षित होण्यासाठी प्रयत्न केला.

  मागील काही वर्षांपासून बीड शहरासह जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती होती मात्र एक-दोन वर्षात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढ झाली. यंदाच्या पावसाळ्यामध्ये देखील बीड शहरासह जिल्ह्यात मोठा खंड निर्माण झाला आहे. त्यातच वेगवेगळ्या महामार्गांच्या कामासाठी कचकडी निर्मिती होत असल्याने अनेक ठिकाणी मोठमोठ्या खदानी निर्माण झाल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी जर खदानी मध्ये जमिनीचा भाग ढासळला मोठा आवाज होऊ शकतो असाही अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातो.

  बुधवारी सकाळच्या सुमारास बीड शहरामध्ये गूड आवाज नागरिकांना ऐकायला मिळाला. कोणत्या दिशेने आवाज आला हे सांगणे कठीण असले तरी शहरातील अनेक भागातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोकळ्या मैदान गाठण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात बीडचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बुधवारी सकाळी गूढ आवाजाचा ऐकू आल्याचा मोबाइलवर मेसेज आले आहेत. त्यानुसार बीड येथील भूजल सर्वेक्षण व यंत्रणा या विभागाला अहवाल देण्याचे निर्देश दिले असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले आहे.

  भूकंप नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका
  बीड शहरामध्ये गूढ आवाज झाल्याची प्राथमिक माहिती आहे भूकंप झाल्याची चर्चा होत असली तरी याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शक्य झाल्यास आफवा पसरवणाऱ्या चा प्रयत्नही कोणाकडून होत असल्यास त्यांची माहिती प्रशासनाला द्यावी, अन्य घटना घडल्यास तेही तत्काळ कळवावे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी केला.

Trending