आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानीचा एल्गार..ऊस उत्पादकांचे थकीत बिल व्याजासह एक रकमी तात्काळ अदा करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊस उत्पादकांचे थकीत बिल व्याजासह एक रकमी तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे. जय महेश एन एस एल शुगर्स लिमिटेड कारखान्याच्या गेटवरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन केले.

 

10 महिन्यांपूर्वी गाळपाला घातलेल्या ऊसाची सुमारे 46 कोटी रुपये कारखान्याकडे
थकीत आहेत. हे थकीत बिल गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे कारखाना प्रशासनाला दिला अल्टीमेंटम देण्यात आला आहे.

 

पोलिसांनी रोखले...

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कारखान्याच्या रोडवर रोखले. यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. नंतर स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी गगन भेदी घोषणा केल्या.

अखेर पोलिसांनी नमते घेत कारखान्याचे गेट खुले करून दिले.

 

युवती प्रदेश अध्यक्षा पुजा मोरे, मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, जेष्ठ नेते अशोक मोरे, कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, राजेंद्र होके पाटील, जेष्ठ नेते रोहिदास तात्या चव्हाण, जालना जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे, राजू गायके, बीड जिल्हा उपाध्यक्ष अमित नाटकर आदी पदाधिकार्‍यांसह शेकडो शेतकरी कारखान्याच्या गेटवर तळ ठोकून आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...