Home | Maharashtra | Vidarva | Akola | T1 Avani tigress Calves pagmarks found in Yawatmal

अवनी वाघिणीच्या बछड्यांचे पगमार्क आढळले..आई दिसेनाशी झाल्याने हे दोन्ही बछडे झाले सैरभैर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 02:11 PM IST

बछड्यांना शोधण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.

  • T1 Avani tigress Calves pagmarks found in Yawatmal

    यवतमाळ- टी-1 अवनी वाघिणीला ठार करण्यात आल्यानंतर राजकीय रान पेटले आहे. वाघिणीच्या मृत्यूनंतर सैरभैर झालेल्या तिच्या 10 महिन्यांच्या दोन बछड्यांच्या पंजाचे ठसे चिखली-आरमुरडी या गावाच्या परिसरात गुरुवारी आढळून आले.

    वन विभागाच्या वतीने या बछड्यांना शोधण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाकडून बछड्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यात या बछड्यांचे दर्शन झाल्याची माहिती विविध ठिकाणावरुन प्राप्त होत आहे. त्यातच चिखली आरमुरडी परिसरात या बछड्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. त्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी जावुन बछड्यांच्या शोध सुरू केला. त्यात बछड्यांचा सायंकाळपर्यंत पत्ता लागला नसल्याचे सांगण्यात आले.

    जिल्ह्यातील राळेगाव, कळंब आणि पांढरकवडा या तीन तालुक्यात दहशत असलेल्या टी-1 या वाघीणीला 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ठार मारण्यात आले. मात्र ती वाघीण ठार झाल्यानंतर तीच्या दोन बछड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. आई दिसेनाशी झाल्याने हे दोन्ही बछडे सैरभैर झाले आहेत.

Trending