आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदींना पवारांची क्लीन चिट; राष्ट्रवादीचे सरचिटणीस तारिक अन्वर यांची पक्षाला सोडचिठ्ठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रफाल विमान करारप्रकरणी माेदींच्या हेतूवर काेणालाही शंका नाही, या पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर अाक्षेप घेत राष्ट्रवादीचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. खासदारकीचाही राजीनामा दिला. तसेच रफालप्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची मागणीही त्यांनी केली.  


राज्यातील राष्ट्रवादीचे सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही याच मुद्द्यावर पक्षाला रामराम केला. ‘पवारांनी माेदींना दिलेली क्लीन चिट चूक आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर पक्षात राहणे माझ्यासाठी अशक्य झाले होते,’ असे अन्वर म्हणाले.

 

काॅंग्रेसमध्ये जाणार...

सूत्रांनुसार, तारिक अन्वर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता तारिक अन्वर यांचा राजीनामा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

 

प्रफुल्ल पटेलांनी साधला तारिक अन्वर यांच्यावर निशाणा..

तारिक अन्वर यांचे शरद पवारांवरील आरोप चुकीचे आहेत. अन्वर यांचा राजीनामा म्हणजे बेजबाबदारपणा आहे, अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी अन्वर यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

पक्षश्रेष्‍ठींना न सांगता राजीनामा देणे चुकीचे असून आम्ही कोणालाही क्लिन चिट दिली नसल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...