आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात संतापलेल्या शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, गंभीर अवस्थेत आयसीयूत दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- निगडी येथील सेंट उर्सुला शाळेत एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत लोकमान्य हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू)  दाखल करण्‍यात आले आहे. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी म्हटले आहे. हर्षल असे विद्यार्थ्याने नाव आहे.

 

 

मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (22 ऑक्टोबर) हर्षल आणि शिक्षिका नंदिनी सुमीतच्या मुलाचे भांडण झाले होते. त्यावरून शिक्षिकेने हर्षलला वर्गातून बाहेर नेऊन बेदम मारले होते. याप्रकरणी हर्षलच्या आई-वडीलांनी पोलिसांत तक्रार केली आहे. शाळेत बसविलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संबंधित शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिेसांनी सांगितले आहे.

 

नातेवाईकांनी केली कठोर कारवाईची मागणी:

या घटनेमुळे हर्षलचे नातेवाईकही चांगलेच संतापले आहेत. शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...