आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून आयटीआय शिक्षक, विद्यार्थ्यांनी वाचवले लांडोरचे प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- आयटीआयला निघालेल्या शिक्षकास कुत्र्याचा मोठा आवाज ऐकू आला..आवाजाच्या दिशेने शिक्षकाने जाऊन पाहिले असता लांडोर (मोर मादी) असून आली..शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फोन करून बोलावून घेतले..विद्यार्थी आणि शिक्षकांनी कुत्र्याच्या कळपाला दगड मारून हाकलून लावले...दरम्यान लांडोर एका इमारतीमध्ये घुसले. वेळीच याची माहिती वन विभागाला देण्यात आली. वनविभागाचे वनरक्षक, वनमजूर यांनी घटनास्थळी येऊन लांडोरला सुरक्षित ताब्यात घेतले. त्याती तपासणी करून काही तासातच त्याला इमामपूर परिसरातील जंगलात सोडण्यात आले.

 

बीड शहराच्या पश्चिम भागात माळरान डोंगर परिसर आहे. या परिसरात वन्य प्राण्यांचाही वावर आहे. मंगळवारी पहाटेच्या दरम्यान लांडोर मुक्त विहार सुरू असताना कुत्र्यांनी हल्ला सुरू केला. यातील एक लांडोर हे शहरालगत असलेल्या जवाहर कॉलनीत आले. सकाळी साडेसातच्या दरम्यान जवाहर कॉलनी कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. याच रोडने आयटीआयला जाण्यासाठी निघालेली प्राध्यापक किरण साळुंखे यांनी कुत्र्यांच्या दिशेने जाऊन परिस्थिती पाहिली असता त्यांना एका बंगल्यामध्ये परिसरात लांडोर दिसून आली. त्यांनी लगेच आयटीआयमधील विद्यार्थ्यांना फोन करून बोलावून घेतले. कमलेश निर्मळ, गणेश राऊत, ऋषिकेश वैष्णव, संतोष सोळुंके या विद्यार्थ्यांनी जवाहर कॉलनीमध्ये येऊन कुत्र्यांना हाकलून लावले. त्यानंतर प्राध्यापक साळुंखे यांनी दिव्य मराठीचे रिपोर्टर रवी उबाळे यांना माहिती दिली, त्यांनी वन विभागाचे उपविभागीय वनाधिकारी ए. आर. सातपुते यांना या प्रकाराची माहिती सांगितली. अर्ध्या तासामध्ये बीड तालुक्याचे वनरक्षक आर.पी. यादव, वनमजूर वसंत वैद्य, चालक राजेंद्र कोकणे यांची टीम उपविभागीय वन अधिकारी  सातपुते यांनी जवाहर कॉलनीमध्ये पाठवली. या टीमने बंगल्यामध्ये प्रवेश करून परिसरात लांडोर भरारी घेऊन उडून जाऊ नये, याची दक्षता घेतली. दहा ते पंधरा मिनिटांमध्ये लांडोरला ताब्यात घेतले.

महाविद्यालयात जाणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जागृतीमुळे जीवनदान मिळाले. यानंतर वनरक्षक यादव यांनी लांडोर यास उपविभागीय वनाधिकारी कार्यालयामध्ये देऊन नोंदणी केली तसेच अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये इमामपूर परिसरातील जंगलामध्ये अकराच्या सुमारास सोडतात लांडोर ने भरारी घेऊन पुन्हा मुक्त संचार केला.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...