Home | Maharashtra | Mumbai | Telangana trs leader stoned to death in vikarabad no case registered till now

टीआरएस नेत्याची दगडाने ठेचून हत्या, मृताच्या नातेवाइकांचा काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांवर हल्ला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 07:06 PM IST

नारायण रेड्‍डी यांच्या गाडीच्या चालकाने एका महिलेला अपशब्द वापरला होता.

  • Telangana trs leader stoned to death in vikarabad no case registered till now

    हैदराबाद- तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यात टीआरएसचे स्थानिक नेते नारायण रेड्डी यांची अज्ञात समाजकंटकांनी दगडाने ठेचून व काठीने मारहाण करत हत्या केली. जिल्ह्यातील सुलतानपूर गावात ही घटना घडली. रेड्डी यांच्या हत्येचे वृत्त पसरताच त्यांचे समर्थक व नातेवाइकांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण केली.

    दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण यांच्या गाडीच्या चालकाने एका महिलेला अपशब्द वापरला होता. त्यानंतर काही जणांनी सोमवारी त्याला त्याच्या घरात बंद केले होते. सोमवारी नारायण तिथे गेले असता त्यांची बेदम मारहाणीत हत्या करण्यात आली. गावात तणाव वाढल्यामुळे पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

Trending