आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
विशेष म्हणजे एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याला माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नेतृत्त्वात फासावर लटकावण्यात आले होते. मीरा बोरवणकर यांनी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर या तिन्ही अधिकार्यांसोबत काम केले होते.
मुंबई हल्ल्यात देशाने तिन्ही जाबाज अधिकार्यांना गमावले तेव्हा क्रुरकर्मा कसाबचा खात्मा करा, हाच संतप्त पोलिस अधिकार्यांमधून सूर होता. परंतु सर्वांनी संयमाने घेतले. कारण कसाब हा एकमेव जिवंत पकडला गेलेला दहशतवादी होता. पाकिस्तान आणि या हल्ल्याशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी त्याला जिवंत ठेवणे आम्हाला गरजेचे होते. कसाब हा माझ्यासाठी दहशतवादाविरोधात आपल्या कमकुवत तयारीचे प्रतीक होता. अखेर त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले...जय हिंद!'
फाशीची प्रक्रिया संपूर्ण यंत्रणेचा किस पाडणारी...
'लोक मला आजही प्रश्न करतात, कसाबला फाशी देताना तुमच्या हृदय आणि डोक्यात काय सुरु होते? लोकांना वाटत असेल की, कसाबला फाशी झाली, त्या दिवशी मला मोठा हर्ष झाला असेल, गौरवान्वित झाल्यासारखे वाटत असेल. परंतु असे काहीच नाही. एखाद्या आरोपीला फासावर चढविण्याची प्रक्रिया अत्यंत जटील असते. ही प्रक्रिया संपूर्ण यंत्रणेचा किस पडणारीच असते. '
- माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर
26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकार्यांचे शौर्य आणि बलिदानाची कथा मीरा बोरवणकर यांच्या लेखणीतून..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.