Home | Maharashtra | Pune | The accused arrested by sinhgad police in Pune for Rape and murder case

मावशीच्या नवर्‍याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार.. नंतर केली गळा आवळून हत्या

प्रतिनिधी | Update - Dec 08, 2018, 06:08 PM IST

मुलगी पुण्यातील एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होती.

  • The accused arrested by sinhgad police in  Pune for Rape and murder case

    पुणे- वडगाव धायरीत राहत्या घरात शिरून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती. या प्रकरणाचा सिंहगड पोलिसांनी अवघ्या बारा तासात छडा लावला आहे. मृत मुलीच्या काकानेच (मावशीचा पती) हे धक्कादायक कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नितीन बाळासाहेब दामोदर (30,रा. नऱ्हे,पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

    नितीन हा एका दुकानात काम करतो. तसेच बांधकाम सार्इटवर तो सेंट्रिगचेही कामे करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री 17 वर्षीय मुलीचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तो संबंधित मृत मुलीच्या इमारतीत प्रवेश करताना दिसला. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. सुरुवातीला चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

    त्याच्या शरीराची पहाणी केली असता,गळ्याजवळ खरचटल्याचे व्रण आढळून आले होते. यामुळे त्याला पोलिसी खाक्‍या दाखवल्यावर त्याने गुन्हा कबुल केला. मुलीचे कुटुंबीय सिंहगड भागातील धायरेश्वर वस्ती येथील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहते, ही मुलगी परिसरातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिला एक 15 वर्षांचा भाऊ असून, तो आठवीत शिकतो. तिचे आई-वडिल मोल-मजूरीचे कामे करतात. नेहमीप्रमाणे आई-वडिल गुरुवारी सकाळी कामासाठी घराबाहेर पडले होते. तर भाऊ शाळेत गेला होता. त्यामुळे ती एकटीच घरी होती. तिचा भाऊ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी आल्यानंतर त्याने बहिण बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली पाहिली. तिला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती उठत नसल्याने त्याने शेजारच्यांना याची माहिती दिली. शेजारच्यांनी तीला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीअंती तिला मृत घोषीत करण्यात आले. तीच्या गळ्यावर दाब दिल्याने मृत्यू झाल्याचा संशय डॉक्‍टरांनी व्यक्त केला होता. शवविच्छेदनात बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.

Trending