आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी अच्युत हांगे यांची नियुक्ती; शिस्तप्रिय व कार्यक्षम अधिकारी अशी ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी अच्युत हांगे यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांशी सहकार्याने वागणे, शिस्तप्रिय व कार्यक्षमवृत्ती अशी प्रशासनात हांगे यांची ओळख आहे.

 

मिरा-भाईंदर महापालिकेत आयुक्त असताना त्यांनी परिवहन व्यवस्थेत सुसुत्रता आणण्याचे उल्लेखनीय काम त्यांनी केले होते. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून शासनाने दक्षिण कोरीया येथील परिवहन व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी निवड केली होती.

 

अच्युत हांगे यांनी यापूर्वी मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, लातूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे तर पिंपरी-चिंचवड, नागपूर, अहमदनगर महापालिकेत अतिरीक्त आयुक्त म्हणून प्रभाविपणे काम पाहिले आहे. लातूर महापालिकेत आयुक्त असताना त्यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उल्लेखनीय काम केले आहे. मिरा-भाईंदर येथे रस्तारुंदीकरण, अतिक्रमण यासारखे अनेक प्रश्न त्यांनी जनतेला विश्वासात घेत कमी वेळेत मार्गी लावले होते.
या नियुक्तीनंतर अच्युत हांगे म्हणाले की, मिरा-भाईंदर, लातूर, भिवंडी-निजामपूर महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना आलेल्या अनुभवाचा वापर करून उल्हासनगर पालिकेतील प्रश्नांवर काम करणार आहे. आतापर्यंत केलेल्या कामाच्या अनुभवाचा उल्हासनगर पालिकेच्या कामकाजात नक्कीच होणार आहे. नागरिकांचे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

 

कार्यक्षम व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून हांगे यांची प्रशासनासह लोकांमध्ये ओळख आहे. उल्हासनगर महापालिकेतील विविध प्रश्नांवर ते काय निर्णय घेतात यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...