एअर इंडियाचे क्रॉन्टॅक्चुअल / एअर इंडियाचे क्रॉन्टॅक्चुअल ग्राऊंड स्टाफने उपसले संपाचे हत्यार..अनेक फ्लाइट्स विलंब

दिव्य मराठी वेब टीम

Nov 08,2018 02:09:00 PM IST

मुंबई- एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट लिमिटेडच्या (एआयएटीएसएल) क्रॉन्टॅक्चुअल ग्राऊंड स्टाफने ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी एअरपोर्टवरून उड्डाण घेणार्‍या विमानांचे वेळापत्रक कोलमडले आहेत. अनेक विमाने उशीराने उड्डाण घेत आहेत.

एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, मुंबई एअरपोर्टवर एआयएटीएसएल कर्मचारी अचानक संपावर गेल्याने समस्या निर्माण झाली आहे. अनेक विमानांच्या उड्डाणाला विलंब होत आहे. समस्या दूर करण्‍यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

विमानात प्रवाशांचा सामान चढविणे, विमानात साफ-सफाई करणे तसेच कार्गोची संपूर्ण जबाबदारी ग्राऊंड स्टाफकडे असते. मात्र, या कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारल्याने सर्व सेवांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

X
COMMENT