आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षांपासून विधवेचे आयुष्य जगत होती महिला..अचानक साधूच्या वेशात आला पती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेगूसराय (बिहार)- 25 वर्षांपासून पत्नीला सोडून गेलेल्या पती अचानक साधूच्या वेशात पत्नी समोर आला. मात्र, त्यांने पत्नीचा पुन्हा विश्वासघात केल्याचे समोर आले आहे. तब्बल 25 वर्षे विधवेचे आयुष्य जगणार्‍या पत्नीला परत आलेल्या पतीने सुमारे 5 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

 

पतीचे निधन झाले असल्याचे 40 वर्षीय श्यामपरी देवी समजत होती. मात्र, अचानक 7 सप्टेंबरला साधूच्या वेशात तिचा पती घरी पोहोचला. रामाशीष घरी परत आल्याने गावकर्‍यांनी घरी मोठी गर्दी केली होती. तब्बल 25 वर्षांनी पती घरी आल्याने श्यामपरीचा आनंद गगनात मावत नव्हता. नातेवाईकही घरी पोहोचले होते. आता पत्नीला सोडून जाणार नाही, असे रामाशीषने सांगितले. मात्र, त्याआधी गोरखपूर येथे एक भंडारा करायच आहे. त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च येईल, असे त्याने पत्नीसह नातेवाईकांना सांगितले.

 

कर्ज घेऊन दिले अडीच लाख..
नातवाईकांनी कर्ज घेऊन रामाशीषला अडीच लाख रुपये दिले. त्याने हे पैसे आपल्या अनुयायीला दिले आणि त्याला गोरखपूरला पाठवून दिले. दुसर्‍या दिवशी तो पत्नीला म्हणाला, भंडारा झाल्यानंतर दागिने आपल्या गुरुला दाखवावे लागतील. त्यानंतर आपण एकत्र राहू शकतो. सुखाचा संसार करू शकतो. श्यामपरीने घरातील सर्व दागिने घेऊन ती रामाशीषसोब गोरखपूरकडे निघाली. मात्र, रामाशीष याने पत्नीकडून दागिने घेतले आणि उद्या घरी येतो, असे सांगून पत्नीला घरी पाठवले. मात्र, रामाशीष परत आला नाही.

 

एसपी ऑफिसमध्ये पोहोचली श्यामपरी
श्यामपरी मंगळवारी एसपी कार्यालयात पोहोचली. तिने सांग‍ितले की,  तिचा पती 25 वर्षांपासून तिला सोडून पळून गेला होता. परत आला मात्र त्याने तिचा पुन्हा विश्वासघात केला आहे. अडीच लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन तो पुन्हा पळून गेला आहे. अशा व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.

 

काय आहे हे प्रकरण?
मटिहानी पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या चकबल्ली दियारा  येथील रामाशीष पासवान हा 1993 पासून बेपत्ता होता. तेव्हा त्याची पत्नी 15 वर्षाची होती. तिला एक महिन्याचा मुलगा होता.  पाच वर्षे पतीची वाट पाहिल्यानंतर श्यामपरी विधवेचे आयुष्य जगत होता.

बातम्या आणखी आहेत...