आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिस आयुक्तांना अज्ञाताने पाठवला ईमेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलिस आयुक्तांना प्राप्त झाला आहे.'नोव्हेंबर 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांना ठार करु', असे ईमेलमध्ये म्हटले आहे. अज्ञात व्यक्तीने हा ईमेल पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात माहिती दिली.

 

ईशान्य भारतातून आला ईमेल...

पंतप्रधानांना धमकी देणारा ईमेल ईशान्य भारतातील राज्यांमधून आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, ईमेल नेमका कोणी पाठवला आहे, यासंदर्भात अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही.

 

खास पथक  करतेय तपास..

गुप्तचर यंत्रणांनीही याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी खास पथक तयार केले आहे.

 

जूनमध्येही मिळाली होती धमकी...
नरेंद्र मोदी यांना मारण्याच्या धमकीची एक पोस्ट जून 2018 मध्ये 'फेसबुक'वर आली होती. गाझियाबादमध्य राहाणार्‍या एका व्यक्तीने ही पोस्ट केली होती.  नरेंद्र मोदी यांना गोळी घालेन, असे त्यात म्हटले होते. यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला होता.

 

दुसरीकडे, पुण्यातील भीमा-कोरेगांव हिंसाचाराच्या चौकशीत पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. चौकशीत डाव्या पक्षाच्या नेत्यांचे एक पत्र सापडले होते. त्यात राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्याहत्येचा कट रचण्यात आल्याचा उल्लेख होता.

बातम्या आणखी आहेत...