Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Three suicides in the same family in Beed

बीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या; आत्महत्या की हत्या कारण अस्पष्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:55 PM IST

गणेश शिंदे यांनी गळफास घेतला असून त्यांची पत्नी आणि मुलगी यांचे मृतदेह घरात आढळून आले.

  • Three suicides in the same family in Beed

    बीड- शहरातील नामदेव नगर भागात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली.

    मिळालेली माहिती अशी की, गणेश शिंदे यांनी गळफास घेतला असून त्यांची पत्नी आणि मुलगी यांचे मृतदेह घरात आढळून आले. मात्र, या आत्महत्या आहेत की, हत्या कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू असून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्या आहेत.

Trending