आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 कोटींच्या कारने फिरतो आमिर खान, यूकेहून मागवली होती 3 कोटींची Rolls Royce

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता आमिर खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तान' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 7 नोव्हेंबर रोजी रिलीज होत असलेल्या या चित्रपटात आमिरने आजार नावाच्या ठगाची भूमिका वठवली आहे. आमिर 2011 साली Rolls Royce Ghost ही लग्झरी कार खरेदी केल्याने चर्चेत आला होता. खरं तर महागड्या गाड्या खरेदी करणे ही बॉलिवूड स्टार्ससाठी अगदी सामान्य बाबा आहे. पण आमिरने  1.22 कोटींच्या या कारसाठी 3.11 कोटी रुपये दिले होते. खास यूकेहून मागवलेल्या या कारचा क्रमांक MH 11 AX 1 आहे. व्हीआयपी नंबर (1) मिळवण्यासाठी त्याने तीन लाख रुपये खर्च केले होते. याशिवाय RTOला 45.57 लाख रुपयांचा टॅक्स आणि 1.41 लाखांची कस्टम ड्युटी त्याला भरावी लागली होती. मेटॅलिक सिल्व्हर कलरची ही कार दुस-या अॅड्रेसवर रजिस्टर्ड आहे. आमिरच्या कार कलेक्शनिवषयी सांगायचे झाल्यास, त्याच्याजवळ BMW 7 सीरिज (1.2 कोटी), रेंज रोवर (1.74 कोटी), बेंटले कांटिनेंटल फ्लाइंग स्पर (3.10 कोटी), रॉल्स रॉयस कूपे (बुलेटप्रूफ) (4.6 कोटी), मर्सिडीज बेंज एस600 Guard (10.50 कोटी) या लग्झरी गाड्या आहेत. मर्सिडीज बेंज एस600 Guard ही बुलेटप्रूफ आणि बॉम्बप्रूफ कार आहे. 


पुढील स्लाईड्सवर नजर टाकुयात, आमिरच्या कार कलेक्शनवर... 

बातम्या आणखी आहेत...