आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्सिडेंटनंतर महिलेला डॉक्टरांनी दिले अँटीबायोटिक, नंतर झाले असे काही.. हादरुन गेले मेडिकल सायन्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ही स्टोरी 'मेडिकल सायन्स' सीरीजवर आधारित आहे. जगभरात मेडिकल सायन्सशी निगडीत अनेक घटना घडतात.)

वॉशिंग्टन- अमेरिकेत एक अनोखी घटना समोर आली आहे. 55 वर्षीय महिलेच्या जीभेवर चक्क केस उगले आहेत. महिलेचा अॅक्सिडेंट झाला होता. तिला उपचारासाठी सेंट लुइस हॉस्पिटलममध्ये अॅडमिट केले होते. डॉक्टरांनी तिला अॅंटीबायोटिक औषध दिले होते. औषधीच्या साइड इफेक्टमुळे महिल्याच्या जीभेवर केस उगल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

 

अॅंटीबायोटिक औषधाचा झाला साइड इफेक्ट
- वॉशिंग्टनमधील सेंट लुइस हॉस्पिटलचे डॉक्टर्सनुसार, 'अॅक्सिडेंटनंतर महिलेच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. जखमा एवढ्या गंभीर होत्या की, त्यात इंफेक्शन पसरले होते. त्यामुळे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी महिलेला इंट्राव्हिनस मेरोपेनेम आणि ओरल मायनोसायक्लाइन नामक अँटीबायोटिक औषधीचा डोस देण्यात आला होता.'

- औषधीमुळे आठवड्याभरात महिलेची जीभ काळी आणि रखरखीत होण्यास सुरुवात झाली. तिच्या तोंडातून दुर्गंधी येत होती. डॉक्टरांनी तपासणी केली असता महिलेला मायनोसायक्लाइन औषधीचा साइड इफेक्ट झाल्याचे समोर आले.

- डॉक्टरांनुसार, या आजाराला वैद्यकीय भाषेत 'ब्लॅक हेअरी टंग' असे संबोधले जाते. ही एक अस्थाई समस्या असते. यापासून आपल्याला कोणतेही नुकसान पोहोतच नाही. साधारणपणे तोंड व्यवस्थीत न धुतल्यामुळे हा आजार उद्‍भवतो.

-  'ब्लॅक हेअरी टंग'मध्ये जीभ काळी, हिरवी, पिवळी तर कधी-कधी पांढरी पडते. यासोबत जीभेवर केस उगतात.
- यानंतर डॉक्टरांनी तत्काळ महिलेला दिलेली मायनोसायक्लाइन औषध बंद केले. नवे औषध लिहून दिले. तसेच तोंड व्यवस्थीत धुण्याचा सल्ला दिला. महिन्याभरात महिलेच्या जीभेवर उगलेले केसही नाहीसे झाले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...