30 वर्षीय ट्रान्सजेंडर / 30 वर्षीय ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला गोंडस बाळाला जन्म, कॅसी आधी होता किन्नर

दिव्य मराठी वेब टीम

Nov 06,2018 12:06:00 AM IST
मुंबई- 30 वर्षीय कॅसी सुलिवानने मुलाला एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने त्याच्या मुलाचे नाव फिनिक्स असे ठेवले आहे. कॅसीने एका सर्जरीद्वारे मुलाला जन्म दिला आहे. यासाठी त्याने जवळपास सात दिवस प्रसुतीवेदना सहन केल्या होत्या.

डिलिव्हरीनंतर फार खुश होता कॅसी...
ट्रान्सजेंडर असल्याने कॅसीच्या प्रेग्नेंसीची अनेकांनी थट्टा केली. रस्त्यावर भेटणारे लोक त्याच्या बेबी बंपला पाहून त्याची मस्करी करत होते. कॅसीने सांगितले की, डिलिव्हरीनंतर फिनिक्सचा आवाज ऐकला, तेव्हाचा तो क्षण शब्दात सांगणे फार कठीण आहे. प्रेग्नेंसीवर लोकांची प्रतिक्रिया ऐकून फार वाईट वाटल्याचेही तो म्हणाला. परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष केले.

प्रेग्नेंसीबद्दल काय म्हणतो कॅसी..
कॅसीने सांगितले की, मुलांना जन्म देण्याचा अधिकार केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही आहे. पुरुष असतानाही मी प्रसुती वेदना सोसल्या. सकाळचा थकवा या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. कॅसीने डिलिव्हरीचे फोटोज् आणि व्हिडिओज् फेसबुक आणि युट्युब चॅनलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. याद्वारे दुसरे ट्रान्सजेंडरही त्यांच्या स्वतःच्या मुलांचा विचार करु शकतील.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... कॅसीचे काही खास PHOTOS...

X
COMMENT