आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकास 5 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या तालुक्यातील डोंगरकठोरा येथे लाचखोर मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक अधिकार्‍यांनी रंगेहाथ अटक केली. शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पकडले.

 

याबाबत अधिक वृत्त असे, की डोंगरकठोरा येथील शासकीय आश्रम शाळेत भाजीपाला पुरवठा करणारे कंत्राटदाराचे भाजीपाल्याचे बिल मंजुरीसाठी संबंधित राणे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. गुरुवारी राणे यास पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

 

या पथकात पोलिस उपाधीक्षक जीएम ठाकूर यांच्यासह पोलिस निरीक्षक निलेश लोधी व सहकारी यांचा समावेश होता. या प्रकरणी आरोपी राणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...