आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ववैमनस्यातून पेट्राेल टाकून तिघांना जाळण्याचा प्रयत्न; विसर्जनादरम्यान इगतपुरीतील घटनेने खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी- शहरातील कोकणी मोहल्ला येथील तीन जणांना पूर्ववैमनस्यातून पेट्राेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यात एक गंभीर तर दाेन जण किरकोळ भाजले असून जखमींना इगतपुरी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संशयित आरोपी कुणाल किशोर हरकरे याला अटक करण्यात आली आहे. 


प्रशांत ऊर्फ लखन बंडू बोरसे (३०), दीपक बोरसे (२५) आणि बबली गुप्ता (४८) अशी जखमींची नावे आहेत. इगतपुरी शहरातील कोकणी मोहल्ला येथे गणपती विसर्जनाच्या दिवशी रविवारी सायंकाळी गणपती विसर्जन करून आल्यानंतर संशयित आराेपी कुणाल याने लखन आणि दीपक यांना 'तुम्ही माझ्याकडे रागाने का बघता' म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी हा वाद मिटवण्यात आला. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी कुणाल याने घरातून पेट्राेलने भरलेले पातेले आणून पेट्राेलचा बोळा पेटवून प्रशांत बोरसे व त्याचा भाऊ दीपक बोरसे यांच्या अंगावर फेकला. दोघांना वाचवण्यासाठी सुरेश गेले असता तेही भाजले. याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात दीपक बोरसे याने फिर्याद दिली आहे. यात प्रशांत गंभीर भाजला आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस सर्व बाजुंनी या घटनेचा तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...