आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृप्ती देसाई यांना जिवे मारण्याची धमकी; \'सबरीमाला\'प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे केले होते स्वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार असल्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिला. 800 वर्षांची जुनी प्रथा सुप्रीम कोर्टाने घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हा निर्णय दिला. या न‍िर्णयाचे स्वागत करणार्‍या भूमाता ब्रिग्रेडच्या समन्वयक तृप्ती देसाई यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

 

कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तृप्ती देसाई मीडियासमोर अाल्या होत्या. त्यानंतर कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत लवकरच काही महिलांसोबत सबरीमाता मंदिरात प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी 'ट्विटर'वर जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'येथे चुकूनही येऊ नकोस.. याचे परिणाम तुला भोगावे लागतील" अशा शब्दांत धमकी देण्यात आली आहे.

 

दरम्यान, तृप्ती देसाई मागील काही वर्षांपासून महिलांच्या हक्कासाठी लढत आहेत. देसाई यांनी शनि शिंगणापूर येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आले होते. आता शनि मंदिरात महिलांना प्रवेश दिला जातो. तसेच हाजी अली, महालक्ष्मी मंदिर आणि सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश मिळविण्यासाठी आवाज उठविला होता.

 

माझ्या जीवाला धोका.. सुरक्षा द्या..
तृप्ती देसाई यांनी महाराष्ट्र सरकारकडे सुरक्षिततेची मागणी केली आहे. मला जिवे मारण्याची धकमी मिळाली आहे, परंतु मी घाबरणार्‍यांमधली नाही. सबरीमाला मंदिरात मी जरुर जाईल. मी कट्टरपंथींना मुळीच घाबरणार नाही.

 

बातम्या आणखी आहेत...