आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 ATTACK: भूरटा चोर होता अजमल कसाब; कराचीत गेल्यानंतर असा बनला होता क्रूरकर्मा दहशतवादी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मी अजमल कसाबला जेव्हा विचारले तू एवढा मोठा दहशतवादी कसा बनला..? त्यावर तो म्हणाला, 'सर! मी एक भूरटा चोर होतो. छोट्या-मोठ्या चोर्‍या करत गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवले होते. एका व्यक्तीने माझा ब्रेन एवढा वॉश केला की मी रक्ताची होळी खेळण्यासाठी मुंबईत आलो.', असे कसाबने रिटायर्ड ब्रिगेडिअर गोविंद सिंह सिसोदिया यांनी 26/11च्या हल्ल्याशी संबंधित चौकशीत सांगितले होते.

 

मुंबई दहशतवादी हल्ल्याला सोमवारी (26 नोव्हेंबर) 10 वर्षे पूर्ण झालीत. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा ब्रिगेडियर गोविंद सिंह सिसोदिया हे ऑपरेशन ब्लॅक टॉरनेडोचे सदस्य आणि एनएसजीचे तत्कालीन डीआयजी होते. गोविंद सिंह सिसोदिया हे 2010 मध्ये सेवानिवृत्त झाले. चौपालमधील थरोच कोटी येथील रहिवासी सिसोदिया हे सध्या देहरादूनमध्ये तरुणांना आर्मीमध्ये अधिकारी बनण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. सिसोदिया यांनी कोचिंग सेंटर सुरु केले आहे.

 

मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल आमिर कसाब याची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांमध्ये ब्रिगेडिअर सिसोदिया यांचाही समावेश होता. 'दैनिक भास्कर'शी चर्चा करताना ब्रिगेडियर म्हणाले, मुंबई हल्ल्याबाबत कसाबच्या डोक्यात काय शिजले होते, मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. कसाब दहशतवादी कसा बनला आणि त्याचा काय कट होता, हे त्याच्याकडून माहीत करून घ्यायचे होते. ऑपरेशनदरम्यान, रॅपिड अॅक्शन फोर्ड (आरपीएफ), मॅरीन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडोने तब्बल 60 तास मोठी कसरत करून 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते तर कसाब याला जिवंत पकडले होते.

 

कसाब मित्रासोबत करत होता चोरी-चपाट्या..
ब्रिगेडियर सिसोदिया यांनी सांगितले की, चौकशीत कसाब म्हणाला, 'मी एक भूरटा चोर होतो. मित्रासोबत पाकीटमारी करायचो. एके दिवशी मि‍त्राने सांगितले की, चल मोठा हात मारूया. परंतु त्यासाठी मोठे शस्त्र आपल्याकडे असणे गरजे आहे, असेही मित्र म्हणाला. शस्त्र खरेदीसाठी मित्रासोबत मी कराचीला गेला. तिथे एका काकाशी (आका) ओळख झाली. काका, लश्कर-ए-तोयबासाठी काम करत होता. आम्ही त्याच्यासोबत गेलो. आमचा ब्रेन वॉश करण्‍यात आला आणि आम्ही मुंबईत रक्ताची होळी खेळण्यासाठी आलो.'

 

कसाब म्हणाला.. माझी सुटका करा.. मला आई-वडिलांची सेवा करायची आहे.!
ब्रिगेडिअर सिसोदिया यांनी कसाबला प्रश्न केला, सरकारने तुझी सुटका केली तर काय करशील, कुठे जाशील? त्यावर तो म्हणाला मी अम्मी (आई) आणि  अब्बू (वडील) याना भेटेल. मला त्यांची सेवा करायची आहे. 'अल्लाह मुझे माफ करे', असे तो सारखे बडबडत होता. विदेशी नागरिकांना वेठीस धरुन भारताच्या तरुंगात कैद असलेल्या दहशतवाद्यांची सुटका करणे, हा आमचा प्लान होता.'

 

मी पकडला गेलो नसतो तर जास्तीत जास्त लोकांना ठार मारले असते..
सिसोदिया यांनी कसाबला विचारले. मुंबई अटॅक करायचाच होता तर रॉकेट लॉन्चर ‍किंवा असे शस्त्र आणले असते की, त्याने संपूर्ण शहर उद्धवस्त झाले असते. त्यावर कसाब म्हणाला, एके-47 सोबत आणण्यामागे आमचा हेतू वेगळा होता. जास्तीत जास्त लोकांना ठार मारणे हे आमचे टार्गेट होते. जास्तीत जास्त लोकांना ठार मारून आम्हाला दहशत निर्माण करायची होती. मी पकडला गेलो नसतो तर याहून जास्त लोकांना ठार मारले असते.

 

बातम्या आणखी आहेत...