आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत मंत्रालयात सहसचिवपदी बदली झाली आहे. नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली केल्याचे पत्र तुकाराम मुंढे यांना प्राप्त झाले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून नियुक्तीच्या ठिकाणी जाण्याचे निर्देशही मुंढे यांना देण्यात आले आहेत. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत.
हेही वाचा...मंत्री, आमदारांना वेटिंग करायला लावतो हा डायनॅमिक ऑफिसर, 12 वर्षांत झाल्या 11 बदल्या
मुंबईतील नियोजन विभागाचे सहसचिवपद रिक्त असल्याने तिथे मुंढे यांची वर्णी लावण्यात आली. अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांची स्वाक्षरी असलेले पत्र तुकाराम मुंढेंना देण्यात आलं. यापूर्वी 2010 आणि 2012 मध्ये त्यांची बदली मुंबईत झाली होती. लोकप्रतिनिधी आणि मुंढे यांच्यातील टोकाच्या संघर्षानंतर मुंढेंची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे.
नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुकाराम मुंढेंकडे महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली होती. परंतु नाशिक मनपात सत्ताधारी भाजप विरुद्ध मुंढे असा संघर्ष काही दिवसांपासून सुरु हाेता. यातूनच अाॅगस्ट महिन्यात मुंढे यांच्याविराेधात अविश्वास ठरावाचे अस्त्र भाजप नगरसेवकांनी उपसले हाेते. मात्र मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या नेत्यांना समज देत हा ठराव मागे घ्यायला लावला हाेता.
तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या
महापालिका आयुक्त, सोलापूर (2006-07)
प्रकल्प अधिकारी, धारणी (2007)
उपजिल्हाधिकारी, नांदेड (2008)
सीईओ, नागपूर जिल्हा परिषद (2008)
अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नाशिक (2009)
के. व्ही. आय. सी. मुंबई (2010)
जिल्हाधिकारी, जालना (2011)
जिल्हाधिकारी, सोलापूर (2011-12)
विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई (2012)
आयुक्त, नवी मुंबई महापालिका (2016)
पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे (2017)
नाशिक महापालिका आयुक्त (2018)
मुंबई नियोजन विभाग सहसचिव (नोव्हेंबर 2018)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.